ST Bus Smart Card: एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC स्मार्ट कार्ड सक्तीची अंतिम मुदत वाढवली,जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज

एसटी महामंडळाच्या सवलतींचा गैरवापर थांबवणे आणि संपूर्ण प्रवास प्रणाली अधिक तंत्रज्ञान-आधारित व पारदर्शक करणे हा या NCMC स्मार्ट कार्डचा मुख्य उद्देश आहे.

ST Bus Smart Card: एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC स्मार्ट कार्ड सक्तीची अंतिम मुदत वाढवली,जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज

ST Bus Smart Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) अनिवार्य करण्याची अंतिम मुदत आता 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही डेडलाईन 1 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक केंद्रांवर कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांच्या लागलेल्या मोठ्या रांगा आणि अपूर्ण नोंदणी प्रक्रिया यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ जाहीर केली आहे.

पारदर्शक डिजिटल प्रवासासाठी कॅशलेस तिकीट प्रणाली
एसटी महामंडळाच्या सवलतींचा गैरवापर थांबवणे आणि संपूर्ण प्रवास प्रणाली अधिक तंत्रज्ञान-आधारित व पारदर्शक करणे हा या NCMC स्मार्ट कार्डचा मुख्य उद्देश आहे. या कार्डच्या अमलबजावणीनंतर कागदी पास पूर्णपणे बंद होऊन कॅशलेस तिकीट सिस्टीम लागू केली जाईल. 1 सप्टेंबरनंतर ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड उपलब्ध नसेल, त्यांना एसटी प्रवासात सवलत मिळणार नसून पूर्ण भाडे देऊनच तिकीट काढावे लागेल.

हेही वाचा – दर्यापूर-अमरावती मार्गावर  सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लखापूर गावा नजीक  एसटी बस व ट्रकची भीषण धडक झाली.

'या' प्रमुख सरकारी योजनांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी 50 टक्के सवलत, 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना मिळणारी 50 टक्के सूट, आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील वृद्धांसाठी असणारा 100 टक्के मोफत प्रवास यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचा 66.67 टक्के सवलतीचा मासिक पास तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत पास यांसाठीही NCMC कार्ड आवश्यक राहील.

स्मार्ट कार्ड मिळवण्याची पद्धत अन् विविध ओळखपत्रांशी जोडणी
NCMC स्मार्ट कार्ड हे प्रत्येक लाभार्थ्याच्या विशिष्ट ओळखपत्राशी जोडले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे कार्ड आधार कार्डशी जोडले जाईल, तर विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या 'सरल' (SARAL) क्रमांकाशी आणि दिव्यांगांचे कार्ड UDID क्रमांकाशी लिंक केले जाईल. लाभार्थी अधिकृत केंद्रांवर जाऊन रोख रक्कम किंवा UPI द्वारे हे कार्ड रिचार्ज करू शकतात. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकारांना त्यांच्या विभागीय मुख्यालयातून हे कार्ड वितरीत केले जाणार असून प्रवाशांनी या एका महिन्याच्या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Deep Sea Fishing Maharashtra: 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; मात्र किनारपट्टीवरील बंदी कायम, नितेश राणेंची माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number