ST Bus Fare in Diwali : मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; ST महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने त्रस्त असताना, आता दिवाळीपूर्वीच या सार्वजनिक वाहतूक दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

ST Bus Fare in Diwali : मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; ST महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने (ST bus) सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ देणारा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) एसटी महामंडळाने सर्व बसेसच्या भाड्यात 10 टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाडेवाढ 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत लागू असणार आहे. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना या निर्णयामुळे आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

वातानुकूलित बसेस वगळता सर्वांना फटका
राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्यांच्या लाल परीची (ST bus) पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता इतर सर्वच बसेससाठी ही 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येत आहे. त्यामुळे गावखेड्यांतून प्रवास करणाऱ्यांपासून ते लांब पल्ल्याच्या रातराणीने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे.

हेही वाचा – General Manager Of BEST: IAS डॉ. सोनिया सेठी यांची बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती

भाडेवाढीचा परिणाम
या नव्या भाडेवाढीच्या निर्णयानुसार, जिथे सध्या 100 रुपये भाडे (तिकीट) होते, तिथे आता प्रवाशांना 110 रुपये दर आकारले जाणार आहेत. आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने त्रस्त असताना, आता दिवाळीपूर्वीच या सार्वजनिक वाहतूक दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

मागील भाडेवाढ आणि पार्श्वभूमी
गतवर्षी टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असतानाच, राज्य मार्ग परिवहन मंडळाकडूनही भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. त्यावेळी, 24 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती, ज्यामध्ये 14.95 टक्के तिकीट दरवाढीला राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) मंजुरी दिली होती.

हेही वाचा – Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला DGCA ने दिला महत्त्वाचा परवाना; काय होणार फायदा? जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number