MPSC Exam 2025 Postponed : एमपीएससीचा मोठा निर्णय! संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलली, जाणून घ्या नवी तारीख

राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा तसेच इतर भागांत झालेले मोठे नुकसान आणि पुढेही अतिवृष्टीची शक्यता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

MPSC Exam 2025 Postponed : एमपीएससीचा मोठा निर्णय! संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलली, जाणून घ्या नवी तारीख

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 28 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा तसेच इतर भागांत झालेले मोठे नुकसान आणि हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेची नवी तारीख
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करत आयोगाने स्पष्ट केले आहे की, आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण
पूरस्थिती आणि दळणवळण समस्या: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत आव्हानात्मक झाले होते.
मानसिक आणि आर्थिक नुकसान: पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांचा संसार पाण्यात वाहून गेला आहे. अशा कठीण समयी मानसिक ताणतणावात विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अशक्य होते.

हेही वाचा – Ladki Bahin Scheme ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार; सरकारकडून 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुमारे 15 कोटी होणार परत वसुल

सातत्याने मागणी: ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून आयोगाकडे सातत्याने मागणी केली जात होती.
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच, अखेर शुक्रवारी दुपारी MPSC ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्रक पोस्ट करत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


 

अनेकदा विचारल्या जात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे
Q: 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे का?
A : हो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 26 सप्टेंबर रोजी (शुक्रवारी) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे. आता 28 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार नाहीये.
Q: एमपीएससीने पत्रकात काय म्हटले आहे?
A: 28  सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हाकेंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, राज्यातील पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.
Q : एमपीएससी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा कधी होणार आहे?
A : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – Dharashiv Collector Dance : मराठवाड्यातील शेतकरी संकटात मात्र जिल्हाधिकारी नाचण्यात दंग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number