Mount Everest Sherpa alive: मृत्यूच्या दाढेतून परतला! एव्हरेस्टवर बेपत्ता शेर्पा 6 दिवसांनंतर सहीसलामत; घरी अंत्यविधी सुरू असतानाच अचानक जिवंत समोर..

एक नेपाळी शेर्पा (मार्गदर्शक) तब्बल 6 दिवसांनंतर मृत्यूच्या सापळ्यातून जिवंत परतला आहे. त्यांच्या घरी बौद्ध परंपरेनुसार अंत्यसंस्कार सुरू असतानाच ते जिवंत असल्याची बातमी कुटुंबीयांना समजली.

Mount Everest Sherpa alive: मृत्यूच्या दाढेतून परतला! एव्हरेस्टवर बेपत्ता शेर्पा 6 दिवसांनंतर सहीसलामत; घरी अंत्यविधी सुरू असतानाच अचानक जिवंत समोर..

Mount Everest Sherpa Alive : माउंट एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान अनेकदा थरारक आणि चक्रावून टाकणाऱ्या घटना समोर येत असतात, परंतु नेपाळमध्ये निसर्गाचा एक असा अद्भूत चमत्कार घडला आहे, ज्यावर कोणाचाही विश्वास बसणे कठीण आहे. जगातील सर्वोच्च शिखरावर बेपत्ता झाल्यानंतर मृत घोषित करण्यात आलेला एक नेपाळी शेर्पा (मार्गदर्शक) तब्बल 6 दिवसांनंतर मृत्यूच्या सापळ्यातून जिवंत परतला आहे. तो बर्फातून रांगत सुरक्षित खाली आल्याची थक्क करणारी बातमी समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काठमांडूमध्ये त्याच्या घरी कुटुंबीयांनी त्याला मृत समजून बौद्ध परंपरेनुसार अंत्यसंस्काराचे धार्मिक विधीही सुरू केले होते, तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहणारे व्हिडिओही पोस्ट केले जात होते.

'डेथ झोन'मध्ये संपर्का तुटल्यानंतर नेमकं काय घडलं?
हिलरी दावा शेर्पा असे या मृत्यूला चकवा देणाऱ्या अनुभवी गिर्यारोहकाचे नाव आहे. 29 May रोजी एव्हरेस्ट शिखर सर करून खाली उतरत असताना 7500 मीटर म्हणजेच 24600 फूट उंचीवरील 'कॅम्प 3' च्या वर ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर त्यांचा इतर सहकाऱ्यांशी संपर्क तुटल्यामुळे ते बेस कॅम्पवर पोहोचू शकले नाहीत, असे वृत्त बीबीसीने दिले होते. ते ज्या भागात अडकले होते, त्याला एव्हरेस्टचा 'डेथ झोन' म्हणतात. या अत्यंत उंचावरील भागात हवेचा दाब कमालीचा कमी असतो आणि ऑक्सिजनची पातळी अत्यंत खालावलेली असल्याने तिथे माणसाला जिवंत राहणे अशक्य मानले जाते. त्यामुळेच रेस्क्यू टीम आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या जिवंत असण्याची आशा पूर्णपणे सोडली होती.

बर्फाच्छादित उतारावरून रांगत येतानाचा तो क्षण
नेपाळच्या गिर्यारोहण क्षेत्रात या संपूर्ण घटनेला थेट दैवी चमत्कार म्हटले जात आहे. या शोध मोहिमेचे समन्वय पाहणारे '8के एक्स्पेडिशन्स'चे कार्यकारी संचालक पेम्बा शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी एका सपोर्ट टीमला हिलरी दावा शेर्पा हे खुंबू आइसफॉल जवळील बर्फाच्छादित उतारावरून बेस कॅम्पच्या दिशेने रांगत येताना अचानक दिसले. अतिथंडीमुळे त्यांच्या हाताची त्वचा आणि ऊती गोठल्या होत्या, पण त्यांची प्रकृती समाधानकारक होती. त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून प्रथमोपचार करण्यात आले आणि अन्न-पाणी दिल्यानंतर हेलिकॉप्टरने काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! कमी पात्रतेच्या नोकरीसाठी उच्च शिक्षण जाणीवपूर्वक लपवणे बेकायदेशीर

कुटुंबीयांचा विश्वासच बसेना आणि अपूर्ण राहिलेली श्रद्धांजली
तिकडे दावा यांच्या निधनाची बातमी समजल्यामुळे त्यांची पत्नी दामू शेर्पा आणि मुलगी मेंडो ल्हामु शेर्पा घरात अनेक दिवस चालणारा अंत्यसंस्काराचा विधी करत होत्या. या विधीचा दुसरा दिवस सुरू असतानाच त्यांना दावा जिवंत असल्याची बातमी मिळाली. सुरुवातीला स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून ही बातमी समजल्यावर त्यांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी खात्री करण्यासाठी आधी वडिलांचे फोटो मागवले. फोटो पाहिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसरीकडे, त्यांचे सहकारी गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल यांनी तर दावा यांच्या निधनाची खात्री मानून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा व्हिडिओही पोस्ट केला होता. थ्रॉल यांनी सांगितले की, खाली उतरताना हवामान वेगाने बदलत होते आणि दावा एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते, जिथून ते नंतर बेपत्ता झाले.

एव्हरेस्टवरील यंदाचा कठीण मोसम आणि गर्दीचे सावट
यंदाच्या मे महिन्यात जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती, ज्यामध्ये हजारहून अधिक गिर्यारोहक आणि मार्गदर्शकांनी एव्हरेस्ट सर केले. मात्र, यंदाचा मोसम अत्यंत आव्हानात्मक ठरला असून आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हैदराबाद येथील अरुण कुमार तिवारी आणि त्यांचे सहकारी संदीप आरे या दोन भारतीय गिर्यारोहकांचाही काही दिवसांपूर्वी एव्हरेस्टवर मृत्यू झाला. अरुण कुमार तिवारी यांचे डोंगरावरील अथांग प्रेम पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह तिथेच निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला. संदीप आरे यांचा मृतदेह खाली आणण्यात रेस्क्यू टीमला यश आले होते. अगदीच प्रतिकूल आणि जीवघेण्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मृत्यूच्या दारातून 6 दिवसांनंतर जिवंत परतलेले हिलरी दावा शेर्पा यांचे जीवंत असणे खरोखरच थक्क करणारे आहे.

हेही वाचा – RBI Polymer Notes: तुमच्या खिशातील 'कागदी' पैशांचे दिवस संपणार? RBI तयार करणार प्लास्टिक नोटा; काय होणार फायदा?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number