‘चार लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडले’ – संयुक्त राष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम असून आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रशियाच्या आक्रमणानंतर चार लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. युक्रेनमधील चार लाख नागरिकांनी युक्रेन सोडले असून हे नागरिक शेजारील देशांमध्ये पलायन करत असल्याचे, संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे. संयुक्त […]

‘चार लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडले’ – संयुक्त राष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम असून आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रशियाच्या आक्रमणानंतर चार लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे.

युक्रेनमधील चार लाख नागरिकांनी युक्रेन सोडले असून हे नागरिक शेजारील देशांमध्ये पलायन करत असल्याचे, संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या यूएनएचसीआर या शरणार्थीसंबंधित यंत्रणेने म्हटले की, युक्रेनमध्ये लोकांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले जात आहे. तसेच आतापर्यंत ४ लाख २२ हजार लोकांनी युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये पलायन केले असल्याचे यूएनएचसीआरने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number