Global Inflation: मध्य पूर्वेतील युद्धाचा सर्वसामान्यांना मोठा फटका; केवळ गॅसच नव्हे, तर ‘या’ गोष्टीही महागणार

कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने भारतात इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.<br/>

Global Inflation: मध्य पूर्वेतील युद्धाचा सर्वसामान्यांना मोठा फटका; केवळ गॅसच नव्हे, तर ‘या’ गोष्टीही महागणार

Global Inflation: मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित राहिला नसून, त्याचे पडसाद जगभरातील सर्वसामान्यांच्या किचनपासून ते शेतशिवारापर्यंत उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने भारतात इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हॉटेल व्यावसायिक संकटात
युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भारतात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. सरकारने व्यावसायिक गॅस खरेदीवर काही निर्बंध आणले आहेत. अनेक शहरांत गॅसअभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, खानावळी आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. चहा-नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्वच महागले आहे.

कच्च्या तेलाचा 'भडका' आणि जागतिक परिणाम
खनिज तेलाच्या किमती 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने आयात खर्च वाढला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये इंधनाचे दर कडाडले असून काही देशांत आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. युद्धाचा सर्वात धक्कादायक फटका औषध क्षेत्राला बसला आहे. दिल्लीतील औषध व्यापाऱ्यांच्या मते, औषधांसाठी लागणारे बहुतांश घटक (API) आयात केले जातात, ज्यांचा खर्च आता वाढला आहे. प्लास्टिक आणि ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्याने गोळ्यांच्या स्ट्रिप्स आणि बाटल्यांचे पॅकेजिंग महागले आहे. सध्या साठा उपलब्ध असला तरी, लवकरच औषधांच्या छापील किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

हेही वाचा – Middle East Crisis: सागरी व्यापाराला भारताचे 'सुरक्षा कवच'! होर्मुज संकटाच्या पार्श्वभूमीवर 1,000 कोटींचा 'वॉर-रिस्क फंड'

बळीराजाच्या अडचणीत वाढ: खतांचे संकट
शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या उत्पादनात नैसर्गिक वायूचा वाटा 70 टक्के असतो. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे खाडी देशांतील अनेक खत कारखाने बंद पडले आहेत. यामुळे खतांची आयात थांबण्याची भीती असून, याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर आणि पर्यायाने अन्नधान्याच्या किमतींवर होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number