MHADA Lottery : मुंबईनजीक हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; ‘या’ महिन्यात निघणार म्हाडाची 8000 घरांची भव्य सोडत

या योजनेची अधिकृत माहिती ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर इच्छुक नागरिकांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

MHADA Lottery : मुंबईनजीक हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; ‘या’ महिन्यात निघणार म्हाडाची 8000 घरांची भव्य सोडत

MHADA Lottery : मुंबई महानगर क्षेत्राच्या परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी कोकण म्हाडा मंडळाने मोठी गृहनिर्माण योजना जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेची अधिकृत माहिती ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर इच्छुक नागरिकांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात 8,000 घरांची संगणकीकृत सोडत काढण्यात येणार आहे.

यापूर्वी मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी कोकण मंडळाने अधिक मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदीची संधी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

या गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांवर विशेष भर देण्यात आला आहे. एकूण घरांपैकी 20 टक्के घरे सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या निकषांनुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 6,000 सदनिकांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. उर्वरित 2,000 घरे म्हाडाच्या विविध गृहप्रकल्पांमधून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत.

गृहप्रकल्पांची निवड करताना प्रवास आणि दैनंदिन सुविधांचा विचार करण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये या सदनिका उपलब्ध होणार आहेत. रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीची चांगली सुविधा असलेल्या भागांमध्ये घरे असल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि कुटुंबांसाठी ही योजना अधिक उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : वारीप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्था; जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा

कोकण म्हाडाच्या या आगामी सोडतीमुळे स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांना मोठी संधी मिळणार आहे. पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि सुलभ होणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number