MHADA Pune Lottery 2026: पुण्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी; 295 सदनिकांसाठी ‘या’ तारखेपासून नोंदणी सुरू; प्रथम येणाऱ्याला देण्यात येणार प्राधान्य

पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सज्ज झाली आहे. विविध गृहनिर्माण योजनांमधील शिल्लक राहिलेल्या 295 घरांसाठी म्हाडाने विशेष विक्री योजना जाहीर केली आहे.

MHADA Pune Lottery 2026: पुण्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी; 295 सदनिकांसाठी ‘या’ तारखेपासून नोंदणी सुरू; प्रथम येणाऱ्याला देण्यात येणार प्राधान्य

MHADA Pune Lottery 2026: पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सज्ज झाली आहे. विविध गृहनिर्माण योजनांमधील शिल्लक राहिलेल्या 295 घरांसाठी म्हाडाने विशेष विक्री योजना जाहीर केली आहे. यासाठीची ऑनलाइन नोंदणी 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेपासून म्हाडाच्या bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुरू होणार आहे.

योजनेचे स्वरूप आणि घरांची उपलब्धता
या योजनेत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 113 आणि पिंपरी-चिंचवडमधील 182 सदनिकांचा समावेश आहे. यात 1 RK, 1 BHK आणि 2 BHK अशा विविध प्रकारच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, वाघोली, बालेवाडी, हडपसर, पिसोळी, फुरसुंगी, आणि पुनावळे यांसारख्या विकसित भागांमधील सदनिकांचा समोवाश आहे. ही योजना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' यावर आधारित असल्याने, अर्जदाराला उपलब्ध घरांपैकी आपल्या आवडीचे घर तत्काळ निवडता येईल.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
अनामत रक्कम: आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 20,000 रुपये अनामत रक्कम निश्चित केली आहे.
एकूण खर्च: अर्जाचे शुल्क 600 रुपये अधिक 108 रुपये GST, असे एकूण 20,708 रुपये प्रारंभिक भरणा म्हणून भरावे लागतील.
महत्त्वाची अट: घर निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत एकूण विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. मुदतीत पैसे न भरल्यास सदनिकेवरील हक्क रद्द होऊन ती पुढील अर्जदाराला उपलब्ध करून दिली जाईल.

पात्रतेचे निकष
1. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
2. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा (किमान 15 वर्षे वास्तव्य आवश्यक).
3. 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad viral video : पालकांची बेफिकिरी? चिमुकल्याच्या हातात दिलं रिक्षाचं स्टेअरिंग, मुख्य रस्त्यावर….

मध्यस्थांपासून दूर राहा
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि संगणकीय प्रणालीद्वारे पार पडणार असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. म्हाडाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणालाही पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number