Mhada Update: म्हाडाला लागली लॉटरी! न विकलेल्या 1100 घरांतून वर्षाला मिळणार कोट्यवधींचा महसूल; काय आहे नेमका प्लान?

ही घरे 'केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या' (CISF) जवानांना राहण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mhada Update: म्हाडाला लागली लॉटरी! न विकलेल्या 1100 घरांतून वर्षाला मिळणार कोट्यवधींचा महसूल; काय आहे नेमका प्लान?

Mhada Update:  ठाणे जिल्ह्यातील शिरढोण भागात 'म्हाडा'च्या कोकण मंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 18 हजारांपेक्षा जास्त घरांची उभारणी केली आहे. यापैकी 2018 आणि 2025 च्या लॉटरीत विक्री न झालेली सुमारे 1,100 घरे अनेक दिवसांपासून रिकामी पडून होती. या पडून राहिलेल्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यासाठी म्हाडाने एक महत्त्वपूर्ण मार्ग शोधला आहे. ही घरे 'केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या' (CISF) जवानांना राहण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे म्हाडाला दरवर्षी तब्बल 13 कोटी 56 लाख रुपयांचा घसघशीत महसूल मिळणार आहे.

गटनिहाय भाडेदर आणि उत्पन्नाची गणितं
या कराराअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील 600 घरांसाठी दरमहा 8,000 रुपये आणि अल्प उत्पन्न गटातील 500 घरांसाठी दरमहा 13,000 रुपये भाडे आकारले जाणार आहे. ही घरे साधारण 310 ते 450 चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. नियमित भाड्याव्यतिरिक्त सुरक्षेची हमी म्हणून म्हाडाला 2 महिन्यांचे भाडे अ‍ॅडव्हान्स अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून मिळणार आहे, ज्याची एकूण रक्कम सुमारे सव्वादोन कोटी रुपये इतकी होते.

हेही वाचा – Shiv Sena UBT Matoshree Meeting : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी! संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीची तरतूद
म्हाडा आणि CISF यांच्यात यासंदर्भातील अधिकृत कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी मूळ भाड्यात 5 टक्के वाढ करण्याची अट या करारात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात म्हाडाच्या उत्पन्नात अधिक वाढ होत राहील. धूळ खात पडलेल्या घरांचा योग्य वापर तर होईलच, शिवाय देशाच्या सुरक्षेत कार्यरत असलेल्या जवानांना हक्काचा निवारा मिळेल आणि म्हाडाच्या तिजोरीत नियमित उत्पन्नाचा मोठा स्रोत जमा होईल. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number