MHADA Housing Scheme: म्हाडाची बंपर लॉटरी! 354 कुटुंबांचे स्वप्न पूर्ण; अवघ्या 15 लाखांत मिळतंय हक्काचं घर

गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत म्हाडा आणि 'पंतप्रधान आवास योजने'च्या (PMAY) संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तब्बल 354 कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे घर मिळाले आहे.

MHADA Housing Scheme: म्हाडाची बंपर लॉटरी! 354 कुटुंबांचे स्वप्न पूर्ण; अवघ्या 15 लाखांत मिळतंय हक्काचं घर

MHADA Housing Scheme: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) पुणे मंडळाने सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत म्हाडा आणि 'पंतप्रधान आवास योजने'च्या (PMAY) संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तब्बल 354 कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे घर मिळाले आहे. संगणकीकृत पारदर्शक सोडत आणि 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वाचा वापर करून या सदनिकांचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे.

मिरजेत नव्या 34 सदनिका वाटपासाठी सज्ज

सांगली शहरासह मिरज आणि पलूस येथील विविध गृहप्रकल्पांमधून नागरिकांना या घरांचा ताबा देण्यात आला आहे. सध्या मिरजेतील भारतनगर भागात नव्याने उभारलेल्या प्रकल्पातील 34 सदनिका ग्राहकांसाठी सज्ज झाल्या आहेत. या ठिकाणी वीज व पिण्याच्या पाण्याची आवश्यक सोय उपलब्ध झाल्यामुळे लवकरच आणखी 34 कुटुंबांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्या सांगलीतील चिंतामणीनगर, कर्नाळ रोड, अभयनगर आणि पारिजात कॉलनी परिसर म्हाडाच्या वसाहतींनी बहरला आहे.

विशेष आरक्षण आणि अवघ्या 15 लाखांत खरेदीची संधी

फेब्रुवारीत पार पडलेल्या सोडतीनंतर काही उर्वरित रिक्त घरांसाठी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमध्ये दिव्यांग, खेळाडू, तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 13 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 15 लाखांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध होत असल्याने अल्प व मध्यम उत्पन्न गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यतिरिक्त, मीरा हौसिंग सोसायटी (40  गुंठे), पारिजात कॉलनी (12  गुंठे), संजयनगर-अभयनगर (13  गुंठे) आणि मिरज मेडिकल कॉलेजजवळ (12  गुंठे) म्हाडाचे नवीन गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत.

हेही वाचा – Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात जुलैअखेर मुसळधार; ऑगस्ट सुरू होताच पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

पात्रतेचे निकष आणि आवश्यक अटी

म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले की, महापालिका व महावितरणच्या समन्वयाने सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे, तो महाराष्ट्रात गेली 15 वर्ष रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक), आणि अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर आधीपासून कोणतेही घर नसावे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number