Meta platforms layoffs: कामावरून काढून टाकल्याचा राग ‘असाही’ काढला; कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडताना बॅगेत काय-काय भरलं?

मोठ्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सध्याच्या काळात काम करणे किती असुरक्षित बनले आहे, यावर एडेल वू यांनी प्रकाश टाकला आहे.

Meta platforms layoffs: कामावरून काढून टाकल्याचा राग ‘असाही’ काढला; कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडताना बॅगेत काय-काय भरलं?

Meta platforms layoffs: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटामधील एका मोठ्या नोकरकपातीपूर्वी कार्यालयात नेमकी कशी परिस्थिती निर्माण झाली होती, याचा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कंपनीच्या माजी महिला कर्मचारी एडेल वू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, नोकरी जाण्याच्या भीतीने आणि अनिश्चिततेमुळे त्या रात्री कार्यालयात जणू काही जगाचा अंत होणार असल्यासारखे भयंकर वातावरण तयार झाले होते. याच भीतीच्या सावटाखाली कर्मचाऱ्यांनी कार्यालयात मोफत मिळणारे स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स आणि इलेक्ट्रॉनिक चार्जर गोळा करून आपापल्या बॅगा गच्च भरून घरी नेल्या होत्या.

कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का
मेटा कंपनीच्या एकूण 18 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना एकाच वेळी घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. वर्ष 2022 मध्ये झालेल्या या छाटणीत कंपनीने जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली होती. एडेल वू यांनी एक्सवर आपले अनुभव शेअर करताना सांगितले की, पहिल्या मोठ्या नोकरकपातीच्या आदल्या रात्री कार्यालयात प्रचंड अस्वस्थता होती. आपल्याला कधीही कामावरून काढले जाऊ शकते याची प्रचिती आल्याने कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील साहित्याची एकप्रकारे लूटच केली.

हेही वाचा – Bhajan Singer Viral Video : गायकावर नोटांचा पाऊस! लोकांनी पोती भरभरून उधळले पैसे; व्हिडिओ पाहून बसेल धक्का

नोकरकपातीची मुख्य कारणे आणि सहकाऱ्यांचे अनुभव
मोठ्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सध्याच्या काळात काम करणे किती असुरक्षित बनले आहे, यावर एडेल वू यांनी प्रकाश टाकला आहे. मेटाव्हर्स या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कंपनीला सोसावा लागलेला प्रचंड आर्थिक तोटा हे या कपातीमागील प्रमुख कारण मानले जाते. आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशन क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आणि कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. वू यांच्या पोस्टनंतर अनेक आजी-माजी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यामध्ये एका युझरने सांगितले की त्याचा सहकारी अधिकृत व्यावसायिक दौऱ्यावर असतानाच त्याला अचानक कामावरून कमी केल्याचा ईमेल आला होता.

सततच्या नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
मेटा कंपनीने वर्ष 2022 मध्ये केलेल्या पहिल्या मोठ्या कारवाईनंतर ही प्रक्रिया थांबवली नाही. एडेल वू यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कंपनीत घालवलेल्या शेवटच्या वर्षात तब्बल 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली नोकरकपात अत्यंत जवळून अनुभवली. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने तीव्र चिंता, भीती आणि प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील या मोठ्या बदलांमुळे भविष्यातही अशा प्रकारची टाळेबंदी कायम राहण्याची भीती आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Palghar News : फळभाज्यांचा ट्रक उलटला तरी लोकं फळं चोरून नेतात; चारोटी पुलावर तर 600 किलो चांदी वाहतूक करणारी व्हॅन उलटली, पुढे काय झालं?…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number