Train Schedule Changed: लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉकचा फटका; चेन्नई, शिर्डी, सातारा एक्सप्रेससह अनेक 24 जुलैपर्यंत गाड्या बंद

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका आणि मुख्य मार्गिका दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

Train Schedule Changed: लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉकचा फटका; चेन्नई, शिर्डी, सातारा एक्सप्रेससह अनेक 24 जुलैपर्यंत गाड्या बंद

Train Schedule Changed: लोणावळा आणि कर्जत दरम्यानच्या घाट क्षेत्रात तिसऱ्या रेल्वे लाईनच्या पुनर्उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका आणि मुख्य मार्गिका दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. परंतु, तिसऱ्या मार्गिकेचे काम अद्याप प्रलंबित असल्याने रेल्वे प्रशासनाला वाहतुकीत तात्पुरते फेरबदल करावे लागले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून 24 जुलैपर्यंत काही एक्सप्रेस धावणार नाहीत, तर काही गाड्यांच्या प्रवासाचे अंतर आणि मार्ग बदलण्यात आले आहेत.

हेही वाचा – Train Viral Video : “तिने केलेलं कृत्य घाणेरडं आणि अचूक” रेल्वेतील छेडछाडी प्रकरणी ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच तरुणीच्या बहीणीची प्रतिक्रिया समोर

मुंबईहून सुटणाऱ्या ‘डाऊन’ मार्गावरील गाड्या रद्द

या रेल्वे कामाचा फटका मुंबईहून विविध शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी चेन्नई एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22157) तसेच हैदराबाद एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22732) २४ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. दादर येथून सुटणारी साईनगर शिर्डी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11041) ही 18, 21, 22 आणि 23 जुलै रोजी रद्द असेल, तर दादर-सातारा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11027) 19, 20 आणि 24 जुलै रोजी धावणार नाही. याशिवाय, दौंड-इंदूर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22943) आणि हडपसर-जोधपूर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20496) २४ जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्या असून, कोल्हापूर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 17411) 18 जुलै रोजी सोडण्यात आली नाही.

परतीच्या ‘अप’ मार्गावरील सेवांवरही परिणाम

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या परतीच्या गाड्यांचे वेळापत्रकही या दुरुस्तीमुळे कोलमडले आहे. चेन्नईहून मुंबईकडे येणारी चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22158) २४ जुलैपर्यंत धावणार नाही. तसेच, शिर्डीहून मुंबईसाठी सुटणारी साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11042) 19, 22, 23 आणि 24 जुलै रोजी बंद ठेवण्यात आली आहे. सातारा येथून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली सातारा-दादर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11028) देखील 18, 20, 21 आणि 25 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number