मविआने मान्य केला ‘जय महाराष्ट्र’चा खुलासा

जय महाराष्ट्र म्हणजे खरी बातमी हे आता पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. राज्यातील ओबीसींच्या मोजणीचा फार्स सर्वप्रथम जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने उघड केला होता. महाविकास आघाडीने अखेर ‘जय महाराष्ट्र’चा खुलासा मान्य केला आहे. आठ जून २०२२ रोजी ‘जय महाराष्ट्र’ या तुमच्या लाडक्या वृत्तवाहिनीने सर्वप्रथम या घटनेचा खुलासा केला होता की, राज्यात ओबीसींच्या मोजणीचा घोळ सुरु […]

मविआने मान्य केला ‘जय महाराष्ट्र’चा खुलासा

जय महाराष्ट्र म्हणजे खरी बातमी हे आता पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. राज्यातील ओबीसींच्या मोजणीचा फार्स सर्वप्रथम जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने उघड केला होता. महाविकास आघाडीने अखेर ‘जय महाराष्ट्र’चा खुलासा मान्य केला आहे.

आठ जून २०२२ रोजी ‘जय महाराष्ट्र’ या तुमच्या लाडक्या वृत्तवाहिनीने सर्वप्रथम या घटनेचा खुलासा केला होता की, राज्यात ओबीसींच्या मोजणीचा घोळ सुरु आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून ओबीसी कोण ते ठरवले जात असून त्यामुळे खरे ओबीसी आणि त्यांची मोजणी होत नाहीए. विशेष म्हणजे मोजणी आयोगाच्याकडून होणे अपेक्षित असताना राज्याच्या ग्रामविकास विभागाने ही मोजणी कशी करायची याचे आदेश देऊन न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले आहे.

ओबीसींच्या मोजणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात ज्याप्रकारे ओबीसींची मोजणी सुरू आहे, त्यामध्ये ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली दिसणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मविआ ज्याप्रकारे इम्पेरिकल डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांतील ओबीसींच्या लोकसंख्येचे आकडे चुकत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच या सर्वेनुसार ओबीसींची कमी संख्या दाखवण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, विशेष म्हणजे पाच दिवसांनी राज्यात ओबीसी मोजणीत होत असलेल्या घोळाबाबत कबुली द्यावी लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर काही अंशी तथ्य आहे. तसेच फडणवीसांच्या मुद्द्यांचे समर्थनही करत आहे. आणि ही बाब आम्याचाही लक्षात आली. इम्पेरिकल डेटा गोळा करताना आम्ही दुरुस्ती करण्यास सांगितले असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

याप्रकरणी आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी ओबीसींवर मविआकडून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.  ‘ओबीसींचे सर्वे करण्याऐवजी राज्य सरकार आडनावावरून, एका ठिकाणी बसून, संगणकावर काम करून सर्वे करत आहे. मात्र, हा सर्वे चुकीचा असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.’ त्यामुळे राज्यसरकार कोणाला मुर्ख बनू पाहताय असा सवालही हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे. तसेच या सर्वेनुसार ओबीसींचे आरक्षण धोक्यात असल्याचे उघड झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number