Islamic scholar Maulana Mahmood Madani Controversial Statement : जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष महमूद मदानी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे देशात नवा वाद निर्माण झाला आहे. “जेव्हा-जेव्हा अत्याचार होईल, तेव्हा-तेव्हा त्याचे उत्तर मिळेलच,” असे मदानी एका भाषणात म्हणाले. अल्पसंख्यांकांच्या (Minorities Rights) अधिकारांना सरकार आणि न्यायपालिका कमकुवत करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने (BJP) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मदनी जाणूनबुजून मुस्लिमांना भडकावत असून, देशाच्या संवैधानिक (Constitutional Institutions) संस्थांवर प्रश्नचिन्ह उभे करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
न्यायव्यवस्थेवर ‘सरकारी दबावाचा’ थेट आरोप
बाबरी मशीद, तिहेरी तलाक (Triple Talaq) आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. न्यायपालिका ‘सरकारी दबावाखाली’ काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. अलीकडच्या काळात झालेले अनेक निर्णय ‘संविधानाने अल्पसंख्यांकांना दिलेल्या अधिकारांचे थेट उल्लंघन’ करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. 1991 च्या ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (Places of Worship Act) असूनही वादग्रस्त प्रकरणे सातत्याने उचलली जात आहेत. अशा घटना संविधानाचे मूळ तरतूद (Constitutional Provisions) कमकुवत करत असल्याचे मदानी म्हणाले.
हेही वाचा – Couple Accident Incident: तेलंगणाहून जळगावला निघालेले दांपत्य रहस्यमयरित्या गायब, पण समोर आलं वेगळचं सत्य
‘सर्वोच्च न्यायालय’ संविधानाचे रक्षक असावे
“संविधानाचे रक्षण केले तरच सर्वोच्च न्यायालय ‘सर्वोच्च’ (Supreme Court) म्हणून ओळखले जाईल,” असेही मदानी यांनी स्पष्ट केले. जर न्यायालयाने संविधानाचे संरक्षण केले नाही, तर ते देशातील सर्वोच्च संस्था (Apex Body) असण्याचा हक्क गमावते, असे त्यांनी म्हटले. याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की, भारताचा सेक्युलर (Secular) आणि लोकशाही (Democratic) ढाचा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला परवानगी देत नाही आणि “भारतातील मुसलमान नेहमी संविधानाशी निष्ठावान राहिले आहेत.” नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जर सरकारने ते काम योग्यरित्या केले नाही, तर त्याची जबाबदारी निश्चित होते, असे ते म्हणाले.
‘जिहाद’ची पवित्र संकल्पना चुकीच्या पद्धतीने मांडली
महमूद मदानी यांनी ‘लव्ह जिहाद’, ‘थूंकी जिहाद’, ‘शिक्षण जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ यांसारख्या शब्दांवरही आक्षेप घेतला. समाज आणि माध्यमांमध्ये जिहाद (Jihad) ज्या स्वरूपात दाखवले जात आहे, ते पूर्णपणे भ्रामक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी केंद्र सरकार आणि माध्यमांवर “पवित्र संकल्पनेला चुकीच्या दिशेने” सादर करण्याचा आरोप केला. मदानी यांच्या मते, जिहादचा मूळ अर्थ धर्मग्रंथांमध्ये इतरांचे कल्याण आणि सेवा करणे आहे, हिंसा करणे नाही. “जिहाद मूलतः एक पवित्र विचार होता आणि राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Bhopal, Madhya Pradesh: Islamic scholar Maulana Mahmood Madani says, "…The enemies of jihad, Islam, and Muslims have turned Islam’s sacred concepts, such as jihad, into terms associated with abuse, disorder and violence. By using phrases like ‘love jihad,’ ‘land jihad,’… pic.twitter.com/KbKSOhhsaD — IANS (@ians_india) November 29, 2025
भाजपची तीव्र प्रतिक्रिया; ‘नवीन जिन्ना’ तयार होत असल्याचा आरोप
मदनी यांच्या वक्तव्यावर भाजपने कठोर विरोध नोंदवला. भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी मदनी मुस्लिमांना भडकावण्याचा आणि देशाच्या संवैधानिक संस्थांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. “भारतात नवीन जिन्ना (Jinnah) तयार होत आहेत, जे मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे शर्मा म्हणाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला मदानी यांच्या वक्तव्याची स्वतःहून दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती केली. तसेच, मदानी “संविधानाचे उल्लंघन करत आहेत” आणि “सर्वोच्च न्यायालयाला उघड आव्हान देत आहेत”, असा आरोप करत त्यांनी केला आणि मदानी यांना ‘आपल्या मर्यादेत राहण्याचा’ (Stay in Limits) इशारा दिला.
हेही वाचा – Pakistan Army: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूरची’ दहशत कायम; घाबरलेल्या पाकिस्तानने बॉर्डरवरून काढला पळ