Membership Suspended: क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! T20 विश्वचषकात खेळलेल्या ‘या’ देशाचे सदस्यत्व ICC कडून रद्द

ICC च्या अधिकृत माहितीनुसार, कॅनेडियन क्रिकेट मंडळ आपल्या कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे योग्य प्रकारे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

Membership Suspended: क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! T20 विश्वचषकात खेळलेल्या ‘या’ देशाचे सदस्यत्व ICC कडून रद्द

Membership Suspended: आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. 1 जून रोजी अहमदाबाद येथे पार पडलेल्या आयसीसी (ICC) मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 'क्रिकेट कॅनडा'चे (Cricket Canada) सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. ICC च्या अधिकृत माहितीनुसार, कॅनेडियन क्रिकेट मंडळ आपल्या कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे योग्य प्रकारे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आयसीसीचे सदस्य म्हणून आपला दर्जा कायम राखण्यासाठी कोणत्याही देशाला ज्या आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक असते, त्या नियमांचे 'क्रिकेट कॅनडा'ने थेट उल्लंघन केल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कॅनेडियन क्रिकेट मंडळ संशयास्पद कारवायांमध्ये दोषी; नियमांचे गंभीर उल्लंघन
आपल्या प्रसिद्धीपत्रकात ICC ने नमूद केले आहे की, कॅनेडियन क्रिकेट मंडळ नियमांच्या गंभीर उल्लंघनासाठी दोषी आढळले आहे. मंडळाने स्पष्ट केले की, कॅनडाने आपली कार्यप्रणाली स्वच्छ आणि निष्पक्ष ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा भंग केला असून ते काही संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आहे. तथापि, आयसीसीने अद्याप या उल्लंघनांची व्याप्ती किंवा त्यामागील नेमकी कारणे पूर्णपणे उघड केलेली नाहीत. या मोठ्या निर्णयानंतर कॅनडाच्या क्रिकेट प्रशासनावर आता अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी ICC सरसावले; निधीचे स्वतः करणार व्यवस्थापन
कॅनेडियन मंडळावर निलंबनाची कारवाई झाली असली, तरी आयसीसीने तेथील खेळाडूंच्या हिताचा विचार करत एक मोठा दिलासा दिला आहे. या बैठकीदरम्यान स्पष्ट करण्यात आले की, कॅनडाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ भविष्यातील सर्व ICC स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होत राहील. खेळाडूंचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी, आयसीसी स्वतः एका विशेष यंत्रणेद्वारे कॅनडा संघाच्या निधीचे थेट व्यवस्थापन आणि देखरेख करेल. याव्यतिरिक्त, आयसीसीने कॅनेडियन मंडळासाठी काही अटी घालून दिल्या असून, त्यांची पूर्तता झाल्यानंतरच त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले जाईल.

हेही वाचा – RCB Victory Parade: बॅक टू बॅक ट्रॉफी जिंकत RCBने रचला इतिहास; पण बंगळुरूत विजयी परेड होणार का?

2026 च्या T20 विश्वचषकातील 'गट अ' मधील प्रवास
कॅनेडियन क्रिकेट संघाने यावर्षी भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित 2026 च्या T20 विश्वचषकात भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांचा संघ 'गट अ' (Group A) मध्ये समाविष्ट होता. कॅनडाचा या विश्वचषकातील प्रवास गट फेरीतच संपला. त्यांनी गट फेरीत एकूण 4 सामने खेळले; त्यापैकी 1 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला, तर 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, भारतीय संघाविरुद्धचा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number