Hong Kong Fire: हाँगकाँगमधील बहुमजली इमारतीत भीषण आग! 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

इमारतीच्या बाहेरील नूतनीकरणासाठी बांधलेल्या बांबूच्या मचानांमुळे आग वेगाने पसरली. लाकडी आणि बांबूच्या रचनेमुळे आग वरच्या मजल्यांवर पोहोचली.

Hong Kong Fire: हाँगकाँगमधील बहुमजली इमारतीत भीषण आग! 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

Hong Kong Fire: हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यात बुधवारी दुपारी एका बहुमजली निवासी संकुलात भीषण आग लागली. यात किमान 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेक रहिवासी गंभीर जखमी झाले. सुमारे 700 लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थळांवर हलवण्यात आले, तर शेकडो लोक बेघर झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, इमारतीच्या बाहेरील नूतनीकरणासाठी बांधलेल्या बांबूच्या मचानांमुळे आग वेगाने पसरली. लाकडी आणि बांबूच्या रचनेमुळे आग वरच्या मजल्यांवर पोहोचली. व्हिडिओंमध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावरून काळा धूर दिसतो, तर अग्निशमन दलाचे जवान शिडी आणि क्रेन वापरून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. ताई पो जिल्हा परिषदेचे सदस्य लो ह्यू-फुंग यांनी सांगितले की, ‘या इमारतीत बहुतेक वृद्ध लोक राहत होते. अनेकांना चालता येत नाही. आग वेगाने पसरल्यामुळे त्यांना बाहेर पडणे खूप कठीण झाले.’ 

हेही वाचा – इम्रान खान यांना संपवलं? तुरुंगाबाहेर हजारो समर्थक जमले; रावळपिंडीत तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आपत्ती निवारण आणि बचावकार्य

आगीची सुरूवात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाली. अग्निशमन विभागाने संध्याकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी सतर्कतेची पातळी वर्ग 3 पर्यंत वाढवली. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली. प्राथमिक तपासात नूतनीकरणाच्या कामादरम्यान वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.  

हेही वाचा – UN Report 2025: ‘या’ शहरात जगातील सर्वाधिक लोकसंख्या! 2025 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात मोठा खुलासा

हाँगकाँगचे मुख्यमंत्री जॉन ली यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, इमारतींमधील अग्निसुरक्षा मानकांचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडच्या काळात हा हाँगकाँगमधील सर्वात भीषण निवासी आग मानली जात आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number