Manoj Jarange : मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, ‘धनंजय मुंडेला वाचवण्याची किंमत पवार-फडणवीसांना मोजावी लागणार’

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, ‘धनंजय मुंडेला वाचवण्याची किंमत पवार-फडणवीसांना मोजावी लागणार’

Manoj Jarange Criticizes Maharashtra Government : जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, आपल्याला दिलेले पोलीस संरक्षण नाकारले आहे. माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला (Key Conspirator) सरकार वाचवत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी धनंजय मुंडे हेच या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस मुंडेंना वाचवत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांना अर्ज देऊन आपले पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी केली. “वाह रे सरकार, तुमच्या नाकीनऊ नाही आणले तर माझं नाव बदलून ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे.

हेही वाचा – Sangli Student Ends Life : शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन; पालकांनी गमावला काळजाचा तुकडा

‘यांना गरिबांची मुलं मेली तरी चालतील. पण या गुन्हेगारांचा वाचवायचं आहे. मला या सरकारने दिलेलं संरक्षण नको,’ असे म्हणत जरांगे यांनी पोलीस संरक्षण नाकारले आहे. तसेच, सरकारला आव्हान दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांनी मुंडेंवर थेट अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक झाले आणि त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी जरांगे पाटील आणि आपली ब्रेनमॅपिंग (Brain Mapping) आणि नार्कोटेस्ट (Narco Test) करण्याची तयारी दाखवली होती. आता जरांगे पाटलांनी ‘नार्कोटेस्टला येतो म्हणणारे लपले आहेत’, असे म्हणत मुंडेंवर निशाणा साधला होता.

हेही वाचा – Vasai School Case : शाळेत उशिरा आल्याने काढायला लावल्या उठाबश्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षिकेला अटक

या प्रकरणात बीडमधून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाचा उल्लेख करत, त्यातील मुख्य आरोपीलाही वाचवले जात असल्याचा दावा केला आहे. आता त्यांनी पोलीस संरक्षण नाकारल्यामुळे “मैदान मोकळे आहे आणि जे कोणी येतील त्यांना सामोरे जाऊ,” असे सार्वजनिक आव्हान दिले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार-फडणवीस यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number