LPG Cylinder Update: घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या घरी पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) जोडणी आहे, त्यांना आता एलपीजी सिलिंडरचा वापर करता येणार नाही. येत्या 1 जुलै पासून अशा दुहेरी कनेक्शन असलेल्या ग्राहकांचा सिलिंडर पुरवठा अधिकृतपणे बंद करण्यात येणार आहे. यामुळे गॅस वितरणातील पारदर्शकता वाढणार असून संसाधनांचा योग्य वापर होण्यास मदत होईल.
काय आहे नवीन नियम?
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार, आता एकाच घरात पीएनजी आणि एलपीजी ही दोन्ही कनेक्शन्स ठेवता येणार नाहीत. ज्या ग्राहकांकडे पीएनजी सुविधा आहे, अशा सुमारे 70,000 हून अधिक ग्राहकांना आपली एलपीजी कनेक्शन्स आता सरकारकडे परत करावी लागतील. पुरवठा विभागाने 'ग्रीन गॅस लिमिटेड'कडून अशा ग्राहकांची यादी मागवली आहे ज्यांच्याकडे दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी 3 महिन्यांत टप्प्याटप्प्याने हा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल.
नवीन पीएनजी जोडणीसाठी 600 रुपये अनामत रक्कम
ज्या भागांत पीएनजी पाइपलाइन उपलब्ध आहे, तिथे नवीन कनेक्शन देण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. जर ग्राहकाच्या घरापासून 300 मीटर परिघात मुख्य पाइपलाइन असेल, तर केवळ एका आठवड्यात नवीन कनेक्शन दिले जाईल. यासाठी ग्राहकांना 6,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट (सुरक्षा ठेव) भरावे लागेल. प्रशासनाने आगामी 3 महिन्यांत 25,000 नवीन पीएनजी जोडण्या देण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे.
सिलिंडरचा काळा बाजार आणि कंपन्यांचा तोटा
एकीकडे नवीन नियम लागू होत असताना, दुसरीकडे गॅस बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरची अधिकृत किंमत 925 रुपये असताना, तो काळ्या बाजारात 1800 ते 2000 रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी रांगा पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, व्यावसायिक गॅसच्या किमती 2,000 च्या पार गेल्या असल्या तरी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. यामुळे तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे 380 रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.