Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; हनिमूनला गेल्यानंतर पतीचा गेम करणाऱ्या पत्नी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

इंदूरमधील बहुचर्चित 'राजा रघुवंशी मृत्यू' प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला शिलाँग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशी मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; हनिमूनला गेल्यानंतर पतीचा गेम करणाऱ्या पत्नी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर

Sonam Raghuvanshi Bail: इंदूरमधील बहुचर्चित 'राजा रघुवंशी मृत्यू' प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला शिलाँग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आपल्या हनिमून दरम्यान प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप सोनमवर आहे. राजाचा भाऊ विपिन याने या वृत्ताला दुजोरा दिला असून 27 एप्रिल 2026 रोजी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने इंदूरसह संपूर्ण मध्य प्रदेशात मोठी खळबळ उडाली होती.

हनिमून ठरला शेवटचा प्रवास
राजा आणि सोनम यांचा विवाह 11 मे 2025 रोजी इंदूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर 20 मे रोजी हे दाम्पत्य मधुचंद्रासाठी मेघालयला रवाना झाले. मात्र, 23 मे रोजी चेरापुंजी (सोहरा) भागातील 'नोंग्रियात' गावातील होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच दोघेही बेपत्ता झाले. 2 जून रोजी 'वेई सावडाँग' परिसरातील एका खोल दरीत राजा रघुवंशीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तपासाअंती, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह याच्याशी संगनमत करून राजाला टेकडीवरून ढकलून दिल्याचे समोर आले.

डिसेंबरमध्ये फेटाळला होता अर्ज, आता दिलासा
यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये शिलाँग न्यायालयाने सोनमचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आता अटकेच्या सुमारे 10 महिन्यांनंतर तिला जामीन मिळाला आहे. सोनमने यापूर्वी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते, त्यानंतर तिला 9 जून 2025 रोजी रीतसर अटक करण्यात आली होती.

हेही वाचा – Amol Kolhe: वसुली दलालांच्या गुंडगिरीचा कहर; त्या मारहाणीच्या घटनेवरून खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केला संताप, पोस्ट शेअर करत मांडले मुद्दे

प्रियकराच्या मदतीने रचला होता कट
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सोनमचा प्रियकर राज कुशवाह हा तिच्या वडिलांकडेच कामाला होता. या हत्याकांडात राज कुशवाहसह विशाल सिंग चौहान, आकाश सिंग राजपूत आणि आनंद कुर्मी या अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही जप्त केली आहेत. राजावर मागून हल्ला करून त्याला दरीत ढकलण्यात आले होते, असे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले होते. राजा रघुवंशी मृत्यू प्रकरणातील या ताज्या घडामोडींमुळे पीडित कुटुंबाने नाराजी व्यक्त केली असून, न्यायासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number