Santosh Deshmuk Case: सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावरील पुढील सुनावणी आता 10 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.

Santosh Deshmuk Case: सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Santosh Deshmuk Case:  बीड येथील बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावरील पुढील सुनावणी आता 10 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. “माझे डिस्चार्ज ॲप्लिकेशन रद्द झाले याचा अर्थ असा मुळीच नाही की मला जामीन मिळू शकत नाही,” असा युक्तिवाद आरोपीने न्यायालयासमोर मांडला आहे.

हेही वाचा – Ketan Agarwal Case: एक कोटी रुपये, ‘कोडवर्ड’ आणि मृत्यूचा कट! केतनच्या हत्येसाठी सियाने चेतनला दिले पैसे? हत्याकांडातील धक्कादायक रहस्य उघड

विरोधी पक्षाचा आक्षेप आणि आरोपीचा दावा
या सुनावणीदरम्यान आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. हत्येचा आरोपी बाहेर पडून आनंद लुटत होता, त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मागण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला. मात्र, हा आक्षेप चुकीचा असल्याचे सांगत, जामीन मिळणे हा आपला कायदेशीर हक्क असल्याचे आरोपीने न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.

10 जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरण बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत पाहता, आता कोर्ट आरोपीच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय 10 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत यावर आपला महत्त्वपूर्ण निर्णय देण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number