Rohini Paradhye Case : रीलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 25 दिवसांनंतर पतीविरोधात झाला मोठा उलगडा

रोहिणीने ज्या हॉटेलमध्ये आपले अनेक रिल्स शूट केले होते, त्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास लावून तिने आपली जीवनयात्रा संपवली होती.

Rohini Paradhye Case : रीलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 25 दिवसांनंतर पतीविरोधात झाला मोठा उलगडा

Rohini Paradhye Case :  सोशल मीडियावरील आपल्या रिल्सच्या माध्यमातून लाखो चाहत्यांना हसवणारी लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यू प्रकरणाला तब्बल 25 दिवसांनंतर एक मोठा ट्विस्ट मिळाला आहे. रोहिणीने ज्या हॉटेलमध्ये आपले अनेक रिल्स शूट केले होते, त्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास लावून तिने आपली जीवनयात्रा संपवली होती. तिच्या या अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत रोहिणीचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांचे पाऊल; घरगुती वादातून छळ केल्याचा आरोप
रोहिणीच्या मृत्यूला तिचा पतीच जबाबदार असल्याचा थेट आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रोहिणीचे वडील संजय जगताप यांनी याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, लग्नानंतर काही काळापासून निलेश घरगुती कारणांवरून रोहिणीला सातत्याने त्रास देत होता आणि तिच्यावर मानसिक दडपण आणत होता. या सततच्या त्रासामुळेच वैतागून रोहिणीने टोकाचा निर्णय घेतला. वडिलांच्या या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा – Pune News : येत्या 14 तारखेला लग्न, मात्र संसाराची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणावर काळाचा घात; अन् आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले

'बीएनएस'च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल; पोलीस उपनिरीक्षकांकडे तपास
वडिलांनी दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मंगळवेढा पोलिसांनी निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 115(2) (इच्छापूर्वक दुखापत करणे), 352 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायदेशीर कारवाईमुळे आता आरोपी पतीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आता पुढील कायदेशीर पावले उचलत आहेत.
 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number