HSRP Number Plate: HSRP Number Plate: सामान्यांसाठी नियम वेगळे? सरकारी वाहनांवर HSRP नंबरप्लेट नाही, नागपूर अधिवेशनात चर्चा

राज्य परिवहन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

HSRP Number Plate: HSRP Number Plate: सामान्यांसाठी नियम वेगळे? सरकारी वाहनांवर HSRP नंबरप्लेट नाही, नागपूर अधिवेशनात चर्चा

HSRP Number Plate: राज्यातील परिवहन विभागाने जुनी HSRP (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट) बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलून 31 डिसेंबर 2025 पर्यंत कायम ठेवली आहे. ही मुदत त्या वाहनांसाठी लागू आहे ज्यांची नोंदणी 1 एप्रिल 2019 पूर्वी झाली होती. याआधी ही अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती, आणि हीच पाचवी वेळ आहे जेव्हा HSRP बसवण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. विभागाच्या मते, संवेदनशील क्षेत्रांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

दरम्यान, परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले की, सरकारी वाहनांबाबत लोकांचा विश्वास जास्त असल्यामुळे सुरक्षारक्षकही त्याकडे दुर्लक्ष करतात, आणि अशा वाहनांचा चुकीच्या हेतूसाठी वापर होण्याची शक्यता असते. HSRP बसवणे हे सुरक्षा कारणांसाठी अनिवार्य असून, यामुळे कार चोरीसह इतर गुन्हे प्रतिबंधित होतील. माजी पोलीस आयुक्त प्रबीर चक्रवर्ती म्हणाले की, संवेदनशील भागात या नंबरप्लेटकडे दुर्लक्ष करणे मोठ्या समस्यांना जन्म देऊ शकते.

हेही वाचा – MSBSHSE Board Exam: दहावी-बारावी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ठरवली; आता 'या' दिवसापर्यंत भरता येणार अर्ज

राज्य परिवहन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल. हा निर्णय विशेषतः बोगस वाहनांची ओळख पटवण्यासाठी घेतला आहे. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आलेल्या सरकारी वाहनांवर अद्याप नवीन HSRP बसवण्यात आलेली नाही, ज्यामुळे सुरक्षा धोका निर्माण झाला आहे. अधिवेशनात नेते आणि अधिकारी यांच्यासाठी नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातून एकूण 1150 सरकारी वाहनांची सोय करण्यात आली आहे, ज्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले आहे. परंतु अनेक गाड्यांनी अद्याप HSRP बसवलेली नाही.

हेही वाचा – Krushna Khopde On Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप, सत्ताधारी आमदारांचं सभागृहात निर्णायक पाऊल, नेमकं काय घडलं ?

दरम्यान, नवीन HSRP प्लेट इंग्रजीत ‘IND’ अक्षरे, अशोकचक्राचा होलोग्राम आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक ठळक उंच अक्षरात (‘एम्बॉसिंग’) करून बसवली जाते. ही प्लेट वाहनाच्या इंजिन व चेसिस क्रमांकासह केंद्रीय डेटाबेसमध्ये नोंदवली जाते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारी विभागाने या महत्त्वाच्या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले आहे, आणि बनावट नंबरप्लेटसह वाहन अधिवेशन परिसरात आले तर याला कोण जबाबदार असेल?  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number