IPS Officer Transferred: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! 9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वादग्रस्त तुषार दोषींची साताऱ्यातून उचलबांगडी

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जळगावसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असून, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली आता सांगलीत करण्यात आली आहे.<br/>

IPS Officer Transferred: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! 9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वादग्रस्त तुषार दोषींची साताऱ्यातून उचलबांगडी

IPS Officer Transferred:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस दलात मोठी खांदेपालट केली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गृहविभागाकडून 9 जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जळगावसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असून, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली आता सांगलीत करण्यात आली आहे.

साताऱ्यातून तुषार दोषींची रवानगी; निखिल पिंगळे नवे 'SP'
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोषी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि फलटणमधील आत्महत्या प्रकरणामुळे दोषी हे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांच्याही निशाण्यावर होते. विधिमंडळात त्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली होती. अखेर, त्यांची साताऱ्यातून सांगली येथे बदली करण्यात आली असून, पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आता साताऱ्याची सूत्रे हाती घेतील.

कोल्हापूर आणि गडचिरोलीत नवीन नियुक्ती
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी (DIG) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे प्रभावी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या नवीन 'SP' पदी वर्णी लागली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा विचार करता, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे जळगावची जबाबदारी सांभाळतील. याव्यतिरिक्त, पुण्याचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – Titwala Drugs Case : टिटवाळ्यात ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड! ‘ड्रग्ज क्वीन' अँटी नार्कोटिक्सच्या गळाला

फडणवीसांचा 'प्रशासकीय' धडाका
सत्ता हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस हे सातत्याने प्रलंबित बदल्यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. गेल्या आठवड्यात दोनदा सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्यानंतर, आता गृहखात्यातील या बदल्यांमुळे प्रशासकीय कामात अधिक गती येण्याची शक्यता आहे. विशेषतः सीमावर्ती आणि नक्षलग्रस्त भागातील अनुभवाचा विचार करून या नियुक्त्या करण्यात आल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number