Maharashtra Fishing Rules: मच्छीमारांना मोठा दिलासा; खोल समुद्रात मासेमारीला हिरवा कंदील; पण ‘या’ अटींच करावं लागणार पालन

राज्य शासनाने 31 जुलै रोजी या बंदीची मुदत संपल्यानंतर सर्व मासेमारी नौकांना खोल समुद्रात (Deep Sea) जाण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.

Maharashtra Fishing Rules: मच्छीमारांना मोठा दिलासा; खोल समुद्रात मासेमारीला हिरवा कंदील; पण ‘या’ अटींच करावं लागणार पालन

Maharashtra Fishing Rules :  महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत माशांच्या प्रजननासाठी आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी लागू करण्यात आलेली वार्षिक पावसाळी मासेमारी बंदी अखेर उठवण्यात आली आहे. राज्य शासनाने 31 जुलै रोजी या बंदीची मुदत संपल्यानंतर सर्व मासेमारी नौकांना खोल समुद्रात (Deep Sea) जाण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका पुन्हा एकदा उधाणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र, हा आनंद साजरा करत असतानाच प्रशासनाने एक महत्त्वाजी अट घातली असून, किनारपट्टीपासून 12 सागरी मैल अंतरापर्यंतच्या क्षेत्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास 15 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

लहान माशांच्या रक्षणासाठी निर्बंध; प्रजननानंतरच्या काळातील सुरक्षेवर भर
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बंदीचा काळ संपला म्हणून लगेचच किनाऱ्याजवळ मासेमारीला मुभा देणे सागरी पर्यावरणासाठी घातक ठरू शकते. प्रजननाच्या काळात जन्माला आलेले लहान मासे आणि इतर सागरी जीव किनाऱ्यालगतच्या कमी खोलीच्या पाण्यात अधिक प्रमाणात असतात. या लहान माशांची शिकार रोखणे आणि भविष्यात माशांचा साठा मुबलक प्रमाणात टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून किनाऱ्यालगतच्या 12 नॉटिकल मैल क्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत यांत्रिक नौकांवर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाई; कोस्ट गार्ड अन् पोलिसांची करडी नजर
शासनाने सर्व मच्छीमार संस्था, बोट चालक आणि मालकांना या नियमांचे अत्यंत कडकपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 15 ऑगस्टपूर्वी जर कोणतीही यांत्रिक बोट 12 सागरी मैलाच्या आत मासेमारी करताना आढळली, तर तिच्यावर आणि चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी सागरी पोलीस आणि संबंधित विभागाचे पथक गस्त घालणार आहे.

हेही वाचा – Konkan Railway: कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर; मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणार 'ही' एक्स्प्रेस गाडी; रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय

शाश्वत मासेमारीसाठी मच्छीमारांचे सहकार्य अपेक्षित
प्रशासनाच्या या निर्णयामुळे एका बाजूला खोल समुद्रात मोठ्या बोटी नेणाऱ्या मच्छीमारांना दिलासा मिळाला असला, तरी किनाऱ्यालगत लहान होड्यांच्या साहाय्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर आणि सागरी जीवांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number