SRPF Exam Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोळ? एकाच पुस्तकातील 85 प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप

परीक्षेपूर्वीच एका टेलिग्राम अकाउंटवरून संबंधित प्रश्नपत्रिका प्रसिद्ध झाल्याचा दावा केला जात असल्याने, पेपर फुटला की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

SRPF Exam Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोळ? एकाच पुस्तकातील 85 प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप

SRPF Exam Scam: राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट क्रमांक 5 च्या लेखी परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2 मे 2026 रोजी पार पडलेल्या या परीक्षेत एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, परीक्षेपूर्वीच एका टेलिग्राम अकाउंटवरून संबंधित प्रश्नपत्रिका प्रसिद्ध झाल्याचा दावा केला जात असल्याने, पेपर फुटला की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

खासगी क्लासच्या पुस्तकातून प्रश्नांची ‘कॉपी’; सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
SRPF लेखी परीक्षेसाठी काढण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र सराव किंवा अभ्यास न करता, बाजारू पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे. 100 पैकी 85 प्रश्न एकाच ठराविक क्लासच्या पुस्तकातून आल्याने ही परीक्षा यंत्रणा एखाद्या खासगी संस्थेच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे. सरकारी सेवेतील भरती प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा – Plant Scientist Career: वनस्पती शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहताय? 12 वी नंतर मिळेल संधी, जाणून घ्या कोर्सेसबद्दल संपूर्ण माहिती

वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे आक्रमक
या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “वारंवार होणारे पेपर फुटीचे प्रकार आणि खासगी प्रकाशकांशी असलेले संशयास्पद संबंध यामुळे तरुणांचे भविष्य अंधारात जात आहे,” असे मत नेत्यांनी व्यक्त केले आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या दाव्यांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number