Maharashtra Bike Taxi Ban: ओला, उबर आणि रॅपिडोवर सरकारची मोठी कारवाई; गुगल, ॲपलला दिले ॲप्स हटवण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या मोठ्या कंपन्यांची मोबाईल ॲप्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित ब्लॉक करण्यात यावीत, अशी नोटीस महाराष्ट्र सायबर विभागाने गुगल आणि ॲपल (Apple) कंपन्यांना पाठवली आहे.

Maharashtra Bike Taxi Ban: ओला, उबर आणि रॅपिडोवर सरकारची मोठी कारवाई; गुगल, ॲपलला दिले ॲप्स हटवण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

Maharashtra Bike Taxi Ban: महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे पाय पसरणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलले आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या मोठ्या कंपन्यांची मोबाईल ॲप्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित ब्लॉक करण्यात यावीत, अशी नोटीस महाराष्ट्र सायबर विभागाने गुगल (Google) आणि ॲपल (Apple) कंपन्यांना पाठवली आहे. या कारवाईमुळे राज्यातील डिजिटल ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आयटी कायद्यांतर्गत 'नोटीस'चा दणका
महाराष्ट्र सायबर विभागाने 15 मे रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (IT Act) च्या कलम 79(3)(ब) चा वापर करत गुगल आणि ॲपलला अधिकृत निर्देश दिले आहेत. राज्याच्या परिवहन नियमांचे उल्लंघन करणे आणि वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे, या कारणास्तव या ॲप्सचा ॲक्सेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महिलांची सुरक्षा की रोजगार? सरकारची भूमिका स्पष्ट
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी यासंदर्भात सायबर विभागाला पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली होती. बाईक टॅक्सी सेवेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचा ठपका सरकारने ठेवला आहे. नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याने आणि अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सरकारने ही भूमिका घेतली आहे. रोजगारापेक्षा महिलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, असे स्पष्ट करत प्रताप सरनाईक यांनी बेकायदेशीर पेट्रोल बाईक टॅक्सींवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे.

केवळ 'बाईक टॅक्सी'वर बंदी, कॅब आणि ऑटो सुरू राहणार
प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, या कारवाईचा परिणाम केवळ दुचाकी (Bike Taxi) सेवेवर होणार आहे. ओला, उबरच्या चारचाकी गाड्या (Cabs), ऑटो रिक्षा आणि फूड डिलिव्हरी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

हेही वाचा – Nashik Crime : सराफाच्या दुकानावर गोळीबार करत दरोडा; मालकिणीच्या धाडसी प्रतिकारामुळे चोरट्यांचे मनसुबे उधळले, थरार CCTV मध्ये कैद

'ईव्ही' धोरणाचे उल्लंघन
राज्य सरकारने केवळ प्रदूषणमुक्त 'इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी' (EV) चालवण्यास परवानगी देण्याचे संकेत दिले होते. मात्र, या कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न करता हजारो पेट्रोल दुचाकी रस्त्यावर उतरवल्या. दिलेल्या मुदतीत अटी पूर्ण न केल्यामुळे अखेर सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number