Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; पती समर्थ अन् सासू गिरीबाला सिंग यांना 14 दिवसांची कोठडी

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; पती समर्थ अन् सासू गिरीबाला सिंग यांना 14 दिवसांची कोठडी

Twisha Sharma Death Case: मध्य प्रदेशातील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आज एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणातील मुख्य आरोपी ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंग आणि तिची सासू गिरीबाला सिंग यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने या आरोपींसाठी पुढील पोलीस कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

आरोपी माय-लेकांना भोपाळ मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांपासून ठेवणार वेगळे
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील आरोपी समर्थ सिंग आणि त्याची आई म्हणजेच निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना 16 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहवे लागणार आहे. या दोन्ही आरोपींची रवानगी भोपाळ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या आणि प्रकरणाच्या संवेदनशीलतेच्या कारणास्तव या माय-लेकांना तुरुंगातील इतर सामान्य कैद्यांपासून पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येणार आहे.

सीबीआयने सासरच्या घरी नेऊन केले आत्महत्येच्या प्रसंगाचे 'नाट्यरूपांतर'
या कारवाईपूर्वी, सोमवारी सीबीआयच्या एका विशेष पथकाने भोपाळमधील कटारा हिल्स भागात असलेल्या ट्विशाच्या सासरच्या घरी भेट दिली होती. सीबीआयचे पथक दोन्ही आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. गुन्ह्याच्या जागेचे आणि आत्महत्येच्या प्रसंगाचे अचूक नाट्यरूपांतर करण्यासाठी सीबीआयने एका 'मॅनिकिन'चा वापर केला. आरोपींनी चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबांची सत्यता तपासण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली.

हेही वाचा – Crime News: आज इथेच थांबतोय! तो शेवटचा फोन, दुसऱ्या दिवशी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह; 'त्या' रात्री असं काय घडलं?

गळफास कसा उतरवला? आरोपींच्या जबाबांची घटनास्थळावर पडताळणी
या नाट्यरूपांतरादरम्यान, ट्विशाने घरामध्ये नेमक्या कोणत्या खोलीत आणि कोणत्या ठिकाणी आत्महत्या केली, तसेच मृत्यूनंतर तिचा देह गळफासावरून खाली कसा उतरवण्यात आला, या अत्यंत क्लिष्ट बाबींची सीबीआयने प्रत्यक्ष पडताळणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पती समर्थ सिंग याने असा जबाब दिला होता की, ट्विशाला गळफासावरून खाली उतरवणारा तो स्वतःच होता, तर त्याची आई गिरीबाला सिंग हिने गळफासाची गाठ सोडवण्यास मदत केली होती. या सर्व दाव्यांमधील तथ्य शोधण्यासाठी सीबीआयने घटनाक्रमाची बारकाईने पुनरावृत्ती केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number