Asha Bhosle Death: मंगेशकर कुटुंबात मोठी घडामोड; आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर हृदयनाथ मंगेशकर पुण्यातून करणार मोठी घोषणा

आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत.<br/>

Asha Bhosle Death: मंगेशकर कुटुंबात मोठी घडामोड; आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर हृदयनाथ मंगेशकर पुण्यातून करणार मोठी घोषणा

Asha Bhosle Death: भारतीय संगीत क्षेत्राचा जादुई आवाज आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर 7 दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ मंगेशकर कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत.

मुंबईत होणार अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 12 एप्रिल रोजी आशाताईंची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे. आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. राज्य सरकारने या महान गायिकेला पूर्ण लष्करी सन्मानासह निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात 7 वाजता होणार महत्त्वाची घोषणा
मुंबईत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आशाताईंचे धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर हे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर येथे सायंकाळी 7 वाजता एक विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नेमकी कोणती घोषणा करतात आणि आशाताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ काही नवीन उपक्रम जाहीर करतात का, याकडे संपूर्ण कलाविश्वाचे लक्ष लागले आहे.

एक चिरतरुण सांगीतिक प्रवास 
8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी संगीत विश्वात आपल्या नावाची सुवर्ण अक्षरे कोरली आहेत. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेला वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे जपला आणि वाढवला. 11,000 हून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या आशाताईंनी हिंदी, मराठी आणि बंगालीसह अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये आपली जादू चालवली.

हेही वाचा – Asha Bhosle Late Rites : …आणि शेवटी त्यांनी रडवलंच; गानसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

मंगेशकर कुटुंबाचे अपार नुकसान
लता मंगेशकर आणि मीना खडीकर यांच्या पाठोपाठ आशाताईंच्या निधनाने मंगेशकर कुटुंबातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळला आहे. त्यांच्या पश्चात आता उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हा वारसा पुढे नेणार आहेत. आशाताईंच्या निधनामुळे भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग संपले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number