Apple iPhone Price Hike: आयफोन प्रेमींना मोठा झटका; भारतात iPhone महागणार? Apple सवलतींना लावणार कात्री

दिग्गज टेक कंपनी Apple ने भारतात आपल्या काही जुन्या आणि लोकप्रिय मॉडेल्सवर दिली जाणारी विशेष 'रिटेल सपोर्ट' (Retail Support) मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apple iPhone Price Hike: आयफोन प्रेमींना मोठा झटका;  भारतात iPhone महागणार? Apple सवलतींना लावणार कात्री

Apple iPhone Price Hike: जर तुम्ही नवीन आयफोन (iPhone) खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्या खिशाला आता अधिक चाट बसण्याची शक्यता आहे. दिग्गज टेक कंपनी Apple ने भारतात आपल्या काही जुन्या आणि लोकप्रिय मॉडेल्सवर दिली जाणारी विशेष 'रिटेल सपोर्ट' (Retail Support) मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जरी कंपनीने फोनच्या मूळ किमतीत (MRP) अधिकृत वाढ केली नसली, तरी ग्राहकांना मिळणाऱ्या भरघोस सवलती आता कमी होणार आहेत, ज्यामुळे प्रत्यक्षात फोन खरेदी करणे महाग पडणार आहे.

काय आहे 'DG सपोर्ट' आणि त्याचा परिणाम?
आतापर्यंत Apple कडून किरकोळ विक्रेत्यांना 'डिमांड जनरेशन सपोर्ट' (DG Support) दिला जात असे. हे एक प्रकारचे अंतर्गत प्रोत्साहन (Incentive) होते, ज्याच्या जोरावर विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक सवलती देऊ शकत होते. मात्र, आता हा सपोर्ट काढून घेतल्यामुळे विक्रेत्यांकडे सवलत देण्यासाठी फारसा वाव उरणार नाही. परिणामी, iPhone 15 आणि iPhone 16 सारखी मॉडेल्स खरेदी करताना ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल. यापूर्वी कंपनीने आपल्या 'कॅशबॅक ऑफर्स'मध्येही मोठी कपात केली आहे.

स्मार्टफोन उद्योगात किमती वाढण्याचे सत्र
किमती वाढण्याचा हा कल केवळ Apple पुरता मर्यादित नाही. मेमरी आणि स्टोरेज घटकांच्या (Components) वाढत्या किमतींमुळे सॅमसंग (Samsung), शाओमी (Xiaomi), विवो (Vivo) आणि रीयलमी (Realme) यांसारख्या कंपन्यांचा परिचालन खर्च वाढला आहे. अहवालांनुसार, 2026 मध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आपला नफा टिकवून ठेवण्यासाठी सर्वच प्रमुख कंपन्या किमती वाढवण्यावर किंवा सवलती कमी करण्यावर भर देत आहेत.

हेही वाचा – OnePlus Nord 6 मध्ये मिळणार 9000mAh ची अवाढव्य बॅटरी; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

खरेदीसाठी हीच योग्य वेळ?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ज्यांना आयफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी सध्याचा काळ शेवटची संधी ठरू शकतो. एकदा का हा रिटेल सपोर्ट पूर्णपणे बंद झाला की, सवलतींचे प्रमाण निम्म्यावर येईल. सध्या विक्रेत्यांकडे असलेला जुना स्टॉक संपेपर्यंत जुन्या किमतींचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे, जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर विलंब न करता आताच खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number