X Blue Tick Verification : एलॉन मस्क यांना मोठा धक्का, ‘एक्स’ हँडलला बदलावी लागणार पडताळणी प्रणाली

युरोपियन आयोगाने 'X' च्या पडताळणी प्रणालीला (Verification System) दिशाभूल करणारे ठरवत 12 कोटी युरो, म्हणजेच अंदाजे 1,277 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

X Blue Tick Verification : एलॉन मस्क यांना मोठा धक्का, ‘एक्स’ हँडलला बदलावी लागणार पडताळणी प्रणाली

X Blue Tick Verification: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) चे मालक एलॉन मस्क यांना युरोपियन युनियनने (EU) मोठा दणका दिला आहे. युरोपियन आयोगाने 'X' च्या पडताळणी प्रणालीला (Verification System) दिशाभूल करणारे ठरवत 12 कोटी युरो, म्हणजेच अंदाजे 1,277 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईनंतर मस्क यांच्या कंपनीने आपली चूक स्वीकारली असून, प्लॅटफॉर्मवरील 'ब्लू टिक' देण्याच्या पद्धतीत तातडीने बदल करण्याचे मान्य केले आहे. युरोपियन युनियनच्या 'डिजिटल सेवा कायद्या'चे (DSA) उल्लंघन केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

'ब्लू टिक' प्रणालीत बदलाचे निर्देश आणि दंडाची टांगती तलवार
युरोपियन आयोगाच्या मते, सशुल्क (Paid) सेवेद्वारे कुणालाही 'ब्लू टिक' मिळवता येत असल्याने खऱ्या व्यक्ती आणि 'ऑटोमेटेड बॉट्स' ओळखणे कठीण झाले आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरील माहितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावर तोडगा म्हणून 'X' ने सुधारित पडताळणी प्रणालीचे प्रस्ताव आयोगाकडे सादर केले आहेत. आयोगाचे प्रवक्ते थॉमस रेगनियर यांनी या प्रस्तावांच्या मूल्यमापनाला सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. आयोगाने सुधारणा लागू करण्यासाठी 12 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिली होती, तर आर्थिक दंड भरण्यासाठी 16 मार्च 2026 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

हेही वाचा – Elon Musk Super App : एलॉन मस्क यांचे आता येणार सुपर ॲप, असणार या खास सुविधा

काय आहे वादाचे मूळ आणि आंतरराष्ट्रीय पडसाद?
2022 मध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर सेलिब्रिटी, सरकारी संस्था आणि पत्रकारांपुरती मर्यादित असलेली 'ब्लू टिक' सेवा सर्वांसाठी सशुल्क उपलब्ध केली होती. मात्र, 'डिजिटल सेवा कायद्या'नुसार मजकुराचे नियमन करण्यात 'X' अपयशी ठरल्याचे आयोगाचे मत आहे. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकन सरकारने या दंडाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रत्युत्तर म्हणून युरोपियन युनियनच्या नागरिकांवर 'व्हिसा बंदी' घालण्याची धमकीही दिली आहे. या संघर्षामुळे जागतिक स्तरावर सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याबाबत आणि नियमनाबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number