Harshit Rana Replacement: KKR ला मोठा धक्का, हर्षित राणा IPL 2026 मधून बाहेर; बदली खेळाडूबाबत प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा खुलासा

2026 च्या T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. हर्षितवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत आहे.

Harshit Rana Replacement: KKR ला मोठा धक्का, हर्षित राणा IPL 2026 मधून बाहेर; बदली खेळाडूबाबत प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा खुलासा

Harshit Rana Replacement: आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला मोठा हादरा बसला आहे. संघाचा हुकमी एक्का असलेला वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 2026 च्या T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. हर्षितवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे केकेआरच्या गोलंदाजीची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'हर्षितची जागा भरणे सोपे नाही' – प्रशिक्षक अभिषेक नायर
हंगामापूर्व पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "गेल्या दोन हंगामांत हर्षितने केलेली कामगिरी पाहता, त्याचे संघाबाहेर जाणे हा आमच्यासाठी मोठा फटका आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या खेळात मोठी सुधारणा झाली होती. हर्षितची जागा घेऊ शकेल असा सक्षम गोलंदाज शोधणे हे आमच्यासाठी सोपे काम नसेल." हर्षितच्या पर्यायाबाबत विचारले असता, नायर यांनी स्पष्ट केले की संघ व्यवस्थापन सध्या काही गोलंदाजांची चाचपणी करत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

केकेआरपुढील आव्हाने
केकेआरच्या अडचणी केवळ हर्षित पुरत्या मर्यादित नाहीत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याला देखील खेळण्यासाठी अद्याप वैद्यकीय मंजुरी (Medical Clearance) मिळालेली नाही. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणे याचा आपल्या खेळाडूंवरचा विश्वास कायम आहे. T20 विश्वचषकात वरुण चक्रवर्तीची कामगिरी सरासरी असली, तरी तो आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करेल, असा ठाम विश्वास रहाणेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Women's ODI Series Schedule: भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर; 'या' महिन्यात रंगणार कसोटी आणि वनडे मालिका

विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 2012, 2014 आणि 2024 मध्ये अशा तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये केकेआरची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. संघ गुणतालिकेत थेट आठव्या स्थानावर फेकला गेला होता. आता हर्षित राणाच्या अनुपस्थितीत नवीन रणनीती आखून पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरण्याचे मोठे आव्हान प्रशिक्षक नायर आणि कर्णधार रहाणे यांच्यासमोर असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number