Social Media Ban for Under 16: पंतप्रधानांची मोठी घोषणा; 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी

16 वर्षांखालील सर्व मुलांसाठी सर्व प्रकारच्या सोशल मीडिया ॲप्सचा वापर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.<br/>

Social Media Ban for Under 16: पंतप्रधानांची मोठी घोषणा; 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी

Social Media Ban for Under 16: पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी लंडनमधील आपल्या अधिकृत निवासस्थानावरून, म्हणजेच '10 डाऊनिंग स्ट्रीट'वरून या कठोर निर्णयाची अधिकृत घोषणा केली. स्टार्मर यांनी स्पष्ट केलं की, वाढत्या डिजिटल युगात मुलांचे सुख, मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. याच उद्देशाने 16 वर्षांखालील सर्व मुलांसाठी सर्व प्रकारच्या सोशल मीडिया ॲप्सचा वापर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक पंतप्रधान आणि पिता म्हणून घेतला योग्य निर्णय
या संवेदनशील विषयावर बोलताना कीर स्टार्मर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "देशाचा पंतप्रधान आणि स्वतः लहान मुलांचा पिता अशा दुहेरी भूमिकांमधून या परिस्थितीकडे पाहताना, मला हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आणि योग्य वाटले." आजच्या काळात सोशल मीडियाचे मुलांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कायदेशीर बंधनाची नितांत गरज होती, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – US Iran Peace Agreement: अमेरिका-इराण ऐतिहासिक शांतता कराराचे भारताकडून स्वागत; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

टेक कंपन्यांचे आव्हान 
पंतप्रधानांनी हे देखील मान्य केले की, जगातील काही सर्वात मोठ्या आणि बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांशी (Tech Giants) संबंधित असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशी बंदी लागू करणे अजिबात सोपे नसेल. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि कायदेशीर आव्हाने समोर येतील याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. तरीही कोणत्याही नफ्यापेक्षा किंवा दबावापेक्षा आमच्या देशातील मुलांचे शारीरिक-मानसिक आरोग्य आणि त्यांचे कल्याण हेच सर्वात महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी ठाम भर दिला. या निर्णयामुळे आता जागतिक पातळीवर देखील सोशल मीडियाच्या नियमावलीबाबत नव्या चर्चेला उधाण आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number