Chharapati Sambhajinagar Airport: वादळी वाऱ्याचा फटका विमानतळाला! छत उडाले, विमानाचे लॅंडिंगही थांबले; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

जोरदार वाऱ्यामुळे विमानतळाच्या छताचा काही भाग उडून थेट धावपट्टीच्या दिशेने आला. नेमक्या याच वेळी एक विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते.

Chharapati Sambhajinagar Airport: वादळी वाऱ्याचा फटका विमानतळाला! छत उडाले, विमानाचे लॅंडिंगही थांबले; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Sambhajinagar Airport Roof Collapse: छत्रपती संभाजीनगर शहरात अचानक आलेल्या भीषण वादळी पाऊसामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात एक थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे विमानतळाच्या छताचा काही भाग उडून थेट धावपट्टीच्या दिशेने आला. नेमक्या याच वेळी एक विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, छताचे पत्रे उडाल्याने आणि दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) विमानाचे लँडिंग तूर्तास रोखले. प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.

गंगापूरच्या आकाशात विमानाचे हेलकावे
हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आणि वादळामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. परिणामी, प्रवाशांनी भरलेले हे विमान बराच वेळ हवेतच घिरट्या घालत होते. गंगापूर शिवार परिसरात विमान आकाशात गोल चकरा मारत असल्याचे खालील नागरिकांच्या निदर्शनास आले. अनेकांनी विमानाचे हे थरारक दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – Central Railway: मुंबईकरांनो लक्ष द्या! CSMT पुनर्विकासामुळे रेल्वे वाहतुकीत मोठा बदल, पुढील 10 दिवस ‘या’ गाड्या सीएसएमटीपर्यंत जाणार नाहीत

उकाड्यापासून सुटका, पण विमानतळावर धावपळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला होता. आज दुपारी अचानक काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या वादळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, याच वादळाचा फटका विमानतळ प्रशासनाला बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की विमानतळाच्या इमारतीचे पत्रे उडून गेले, ज्यामुळे विमान उतरायला अडचण निर्माण झाली. सुदैवाने, या वादळात कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
एकीकडे विमानतळावर या वादळामुळे यंत्रणेची धावपळ उडाली असली, तरी दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसाचे स्वागत होत आहे. सध्या शेतकरी राजा मान्सूनपूर्व शेतीकामांमध्ये व्यस्त आहे. नांगरणी आणि पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच या पावसाने हजेरी लावल्यामुळे, हा पाऊस पिकांसाठी आणि जमिनीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number