Maharashtra Rain Update : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात वरुणराजाचा मुक्काम! कुठे यलो अलर्ट तर कुठे गारपीट.. जाणून घ्या

महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच, गारपीटीचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain Update : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात वरुणराजाचा मुक्काम! कुठे यलो अलर्ट तर कुठे गारपीट.. जाणून घ्या

Maharashtra Weather Report : महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विशेषतः सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एका बाजूला पावसाचे सावट असले तरी विदर्भात उष्णतेची लाट कायम असून तेथे तापमानाचा पारा 40°C च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पुणे आणि साताऱ्यात गारपिटीचा तडाखा
राज्यात काही ठिकाणी पावसाने आधीच हजेरी लावली असून पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार गारपीट झाली आहे. पुण्यात दुपारी ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी गारांच्या पावसाने सुरुवात झाली, ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. साताऱ्यातही ग्रामीण आणि शहरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता, मात्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या गारव्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा – Boat Sinking: देवगडच्या समुद्रात थरार! 'अलमका' नौकेला जलसमाधी; 20 खलाशांचा…

शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सूचना
पुढील 4 दिवस पावसाचे असल्याने हवामान विभागाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
– वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेणे टाळावे.
– पावसाचा अंदाज घेऊनच शेतीकामांचे आणि प्रवासाचे नियोजन करावे.
– गारांच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
– विदर्भातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना उष्णतेपासून संरक्षणासाठी काळजी घ्यावी.

उकाड्यापासून दिलासा पण पिकांची चिंता
ऐन उन्हाळ्यात पडलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाली आहे. साताऱ्यात उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, कापणीला आलेल्या पिकांना या पावसाचा आणि गारपिटीचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेत आर्द्रता वाढली असून, नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा – Nashik Water Shortage : नाशिककरांनो लक्ष द्या! जलसंपदा विभागाचा महापालिकेला अलर्ट; आता आठवड्यातून 1 दिवस पाणी…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number