MSRTC Volvo Buses: खासगी ट्रॅव्हल्सला ‘लालपरी’ची दमदार टक्कर; ST च्या ताफ्यात येणार 200 अत्याधुनिक व्होल्वो बसेस

महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो (Volvo) बसेस दाखल होणार आहेत.

MSRTC Volvo Buses: खासगी ट्रॅव्हल्सला ‘लालपरी’ची दमदार टक्कर; ST च्या ताफ्यात येणार 200 अत्याधुनिक व्होल्वो बसेस

MSRTC Volvo Buses: महाराष्ट्रातील एसटी बसच्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासात खासगी आराम बससेवेचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो (Volvo) बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये 170 आसनी आणि 30 शयनयान (Sleeper) क्षमतेच्या बसेसचा समावेश असेल. पहिल्यांदाच एवढ्या अवाढव्य प्रमाणात प्रीमियम दर्जाच्या बसेस एसटीमध्ये समाविष्ट होत असून, सुरक्षितता, आरामदायीपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम प्रवाशांना अनुभवायला मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

दिवसा आरामदायी आसने आणि रात्री शयनयानाची उत्तम सुविधा
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक नागरिक अधिक भाडे मोजून खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. हीच बाब लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने खासगी सेवेच्या तोडीची आणि अधिक विश्वासार्ह सुविधा पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या आणि 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी 45 आसनी बसेस, तर रात्रीच्या प्रवासासाठी 30 किंवा 45 शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार योग्य तो पर्याय निवडता येणार आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि खासगी ॲपवरही आरक्षणाची व्यवस्था
या नवीन आराम बससेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल आरक्षण प्रणाली. प्रवाशांना बसस्थानकावर न जाता मोबाईलवरून घरबसल्या तिकीट आरक्षित करता येईल. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलब्यतिरिक्त, इतर खाजगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही (Travel Apps) या व्होल्वो बसेसचे बुकिंग उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्लॅन आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्ग, वेळ आणि उपलब्ध जागांची माहिती सहज उपलब्ध होऊन तिकीट काढणे अत्यंत सोपे होईल.

हेही वाचा – Devendra Fadnavis: AVAADA सुपर फॅक्टरीपासून मुंबईच्या भविष्यातील आराखड्यापर्यंत; फडणवीसांनी केल्या एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा

नव्या बसेसमध्ये खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन (Hospitality)
प्रवाशांना केवळ प्रवासच नव्हे, तर लक्झरी हॉस्पिटॅलिटीचा अनुभव देण्यासाठी एसटी महामंडळ खासगी संस्थेची मदत घेणार आहे. यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल:   
– प्रशिक्षित मनुष्यबळ: प्रवाशांचे स्वागत, स्वच्छता आणि बसमधील इतर सेवांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.   
– मागणी असलेल्या मार्गांची निवड: महाराष्ट्रांतर्गत आणि आंतरराज्य मार्गांवर जिथे खासगी बसेसना मोठी मागणी आहे, अशा मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल.
– आर्थिक व्यवहार्यता: अंतराचा कालावधी आणि प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊनच या बसेसचे नवीन मार्ग निश्चित केले जातील.

'लालपरी'चा कायापालट; लांब पल्ल्याचा प्रवास सुखद होणार
एसटीचे राज्यभरात पसरलेले विस्तृत जाळे आणि सर्वसामान्यांचा असलेला विश्वास हीच महामंडळाची खरी ताकद आहे. या विश्वासाला आता आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार ग्राहकसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या वाहतुकीत नवीन मानदंड निर्माण केले जात आहेत. या उपक्रमामुळे एसटीची पारंपरिक प्रतिमा बदलून 'लालपरी' एका नव्या, आधुनिक आणि तितक्याच आरामदायी रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.

हेही वाचा – Pune MHADA Lottery 2026: पुणे म्हाडाच्या 4462 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; ऑनलाईन अर्जासाठी नवीन वेळापत्रक जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number