Maharashtra Heatwave: महाराष्ट्र होरपळला! अकोल्यात पारा 45 अंशांच्या पार, परभणीत उष्माघाताचा बळी; कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

गेल्या 5 दिवसांतील तापमानाचा चढता आलेख पाहता अकोल्याची गणना जगातील सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये होत आहे.<br/>

Maharashtra Heatwave: महाराष्ट्र होरपळला! अकोल्यात पारा 45 अंशांच्या पार, परभणीत उष्माघाताचा बळी; कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

Maharashtra Heatwave: राज्यामध्ये सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र भीषण उष्णतेच्या विळख्यात सापडला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने धोक्याची पातळी ओलांडली असून, अकोल्यात तर तापमानाचा पारा विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने राज्यात जणू 'अघोषित संचारबंदी' लागू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अकोला जगातील उष्ण शहरांच्या यादीत
अकोल्यात उन्हाचा तडाखा सर्वाधिक जाणवत असून काल येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील 48 तासांत हे तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 5 दिवसांतील तापमानाचा चढता आलेख पाहता अकोल्याची गणना जगातील सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये होत आहे.

परभणीत दुर्दैवी घटना
वाढत्या उन्हाने आता जीव घ्यायला सुरुवात केली आहे. परभणीमध्ये शिवाजी बबन कांबळे या 37 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. दिवसभर कडक उन्हात काम केल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा प्राण गेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मुंबई आणि जळगावची स्थिती
दरम्यान, नेहमी आर्द्र वातावरण असलेल्या मुंबईतही उष्णतेचा दाह वाढला असून पारा 39 अंशांवर पोहोचला आहे. उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. तथापी, वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर टँकरद्वारे पाणी फवारणी सुरू केली आहे.

विजेच्या मागणीचा उच्चांक
भीषण उष्णतेमुळे घराघरांत एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने देशातील विजेच्या मागणीने 240 गिगावॉटचा टप्पा पार केला आहे. कृषी पंपांचा वाढलेला वापर आणि उन्हाची तीव्रता पाहता, ही मागणी आगामी काळात 270 गिगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – New Rules For Prisoner: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय! लॉकअपमध्ये आता आरोपींसाठी 'स्पेशल ड्रेस कोड'; कारण काय ?

प्रशासनाकडून 'हेल्थ ॲडव्हायजरी' जारी
वाढत्या धोक्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
दुपारी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.
भरपूर पाणी प्या आणि सुती कपड्यांचा वापर करा.
चक्कर येणे किंवा मळमळणे असे त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number