Accidental Deaths In India: देशातील आकस्मिक मृत्यूच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; NCRB च्या अहवालात धक्कादायक खुलासा

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये देशात नोंदवलेल्या 63,609 अकस्मात मृत्यूंपैकी तब्बल 33.5 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

Accidental Deaths In India: देशातील आकस्मिक मृत्यूच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; NCRB च्या अहवालात धक्कादायक खुलासा

Accidental Deaths In India: देशभरातील आकस्मिक मृत्यूच्या घटनांकडे पाहिल्यास महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये देशात नोंदवलेल्या 63,609 अकस्मात मृत्यूंपैकी तब्बल 33.5 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. म्हणजेच देशातील प्रत्येक तिसरा आकस्मिक मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे चित्र समोर आले आहे. तामिळनाडूमध्ये सुमारे 4,100 तर उत्तर प्रदेशात 3,700 च्या आसपास अचानक मृत्यूंची नोंद झाली. या दोन्ही राज्यांचा आकडा मिळूनही महाराष्ट्राच्या जवळपास पोहोचत नाही. राज्यात एकूण 21,310 मृत्यू आकस्मिक स्वरूपाचे नोंदवले गेले, ज्यापैकी 17,661 पुरुष, 3,648 महिला, 1 ट्रान्सजेंडरच्या मृत्यूचा समावेश होता.

हृदयविकाराचा झटका हे प्रमुख कारण

देशात 2023 मध्ये झालेल्या एकूण आकस्मिक मृत्यूंपैकी 35,637 पेक्षा जास्त मृत्यू हृदयविकाराशी संबंधित होते. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती दिसून आली असून राज्यात 14,165 लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. 

हेही वाचा – Dharavi Fire Incident: रेल्वे लाईनजवळील धारावी झोपडपट्टी येथे भीषण आग; रेल्वेसेवेवर परिणाम

अकस्मात मृत्यू म्हणजे नेमके कोणते?

हे मृत्यू रस्ते अपघात, बुडणे, विषबाधा यांसारख्या थेट ओळखण्याजोग्या कारणांमुळे होत नाहीत. अचानक कोसळणे, हृदयविकाराचे झटके, शरीरात घडणाऱ्या आकस्मिक बदलांमुळे हे मृत्यू होतात. अशा घटनांमुळे आलेल्या मृत्यूला अकस्मात मृत्यू असं म्हणतात. 

हेही वाचा – Ambarnath Overbridge Accident: अंबरनाथमध्ये शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात; चार जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात सर्वाधिक वाढ

राष्ट्रीय स्तरावर 2023 मध्ये आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण 14.5 टक्के होते. परंतु, आता यात मोठी वाढ झाली आहे. देशात 2022 मध्ये 56,653 अशा मृत्यूंची नोंद झाली होती, जी 2023 मध्ये वाढून 63,609 पर्यंत गेली. फक्त महाराष्ट्रातच 2,257 प्रकरणांची भर पडली. या धक्कादायक वाढीमुळे राज्यातील आरोग्यव्यवस्थेबरोबरच जीवनशैली, पर्यावरण, ताणतणाव व इतर आरोग्यधोक्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचा आकडा इतर अनेक मोठ्या राज्यांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number