Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात जुलैअखेर मुसळधार; ऑगस्ट सुरू होताच पावसाचा जोर ओसरणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैपासून पावसाचा हा जोर हळूहळू ओसरू लागेल. आयएमडीच्या अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात जुलैअखेर मुसळधार; ऑगस्ट सुरू होताच पावसाचा जोर ओसरणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विश्रांती घेतल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे मुंबई उपनगरांसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, जिथे दिवसभर अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. दक्षिण गुजरातवर सक्रिय असलेल्या विरुद्ध दिशेच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे (शिअर झोन) उत्तर मुंबई, पालघर आणि रायगड परिसरात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला.

26 जुलैपासून पावसाची उसंत; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ऑरेंज अलर्टअंतर्गत जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, 26 जुलैपासून पावसाचा हा जोर हळूहळू ओसरू लागेल. आयएमडीच्या (IMD) पुढील 2 आठवड्यांच्या अंदाजानुसार, 23 ते 30 जुलै आणि 30 जुलै ते 6 ऑगस्ट या काळात राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून, अगदी कोकण किनारपट्टीवरही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – Solapur News : दूषित पाणी प्यायल्याने सोलापुरात एका महिलेचा मृत्यू, तर 40 ते 50 जणांना उलट्या-जुलाब; एकाच अपार्टमेंटमधील घटना

पुणे घाटमाथ्याला ‘रेड अलर्ट’, नाशिकमध्ये गोदावरीला यंदाचा पहिला पूर
पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर अत्यंत तीव्र असून तिथे ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. शहरात गुरुवारी कमाल 27.2 अंश आणि किमान 23.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्याला धुवांधार पावसाने झोडपून काढल्यामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. मात्र, शुक्रवारी नाशिकमधील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे.

24 जुलै रोजी प्रमुख जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ची स्थिती
शुक्रवारी, 24 जुलै रोजी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे आणि उंच लाटा उसळण्याचा धोका असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबणार का? ‘या’ एका चुकीमुळे 80 लाखांहून अधिक अर्ज बाद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number