Rain Update: ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडीप देणार? हवामान विभागाचा 31 जुलै ते 27 ऑगस्टसाठी पावसाचा अंदाज

सुरुवातीच्या धुवाधार पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain Update: ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडीप देणार? हवामान विभागाचा 31 जुलै ते 27 ऑगस्टसाठी पावसाचा अंदाज

Maharashtra August Rain Update: हवामान विभागाने 31 जुलै ते 27 ऑगस्ट या चार आठवड्यांच्या कालावधीसाठी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. येत्या 24 ते 48 तासांत पुणे आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या सुरुवातीच्या धुवाधार पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पुन्हा परततील.

विदर्भात धुवाधार; मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात तूट कायम
विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यात चांगला पाऊस होईल. दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी राहील. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मात्र अजूनही पावसाची तूट कायम राहण्याची चिन्हे असून तिथे कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal: नाशिकमध्ये इतकी वाईट परिस्थिती? नाशिकमधील दुरवस्था पाहून भुजबळ संतापले; थेट म्हटले, "हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार"

प्रशांत महासागरात 'अल निनो'चा तीव्र प्रभाव अन् 3.4 इंडेक्सचा धोका
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात 'अल निनो'ची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे. त्याचा 3.4 इंडेक्स तापमान दर 1.4 अंशांवर पोहोचला असून, हे तापमान 3 अंशांच्या पार जाऊन 2027 च्या वसंत ऋतूपर्यंत कायम राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 2015-2016 मधील महा-अल निनोच्या काळात हे तापमान 2.75 अंश होते. जून महिन्यात देशात झालेली 40 टक्के पावसाची तूट जुलैच्या पावसाने भरून काढली असली, तरी अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पावसाचे प्रदीर्घ स्पेल प्रभावित होण्याचा धोका आहे.

जुलैतील पावसामुळे धरणांत समाधानकारक साठा; शेतीला तात्पुरता दिलासा
ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस लांबल्यास शेतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो; मात्र जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत सध्या पुरेसा ओलावा उपलब्ध आहे. तसेच राज्यातील प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली तरी पिकांचे लगेचच मोठे नुकसान होणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तथापि, पावसाच्या अनियमिततेमुळे आगामी काळात पाण्याचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करणे गरजेचे ठरणार आहे.

हेही वाचा – Mumbai Water Supply: मुंबईकरांवरच पाणीकपातीचे संकट कायम; धरणांमध्ये 88 टक्के साठा असूनही महापालिकेचा मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number