Mahila Bal Vikas Bharti 2026 : 23 वर्षांनंतर मोठी संधी! महिला व बालविकास विभागात 8,669 पदांची मेगाभरती; जाणून घ्या, सविस्तर

या मेगाभरतीमध्ये केवळ नियमित पदांचाच समावेश नाही, तर कामकाजाच्या सोयीसाठी बाह्ययंत्रणेचाही मोठा आधार घेतला जाणार आहे.

Mahila Bal Vikas Bharti 2026 : 23 वर्षांनंतर मोठी संधी! महिला व बालविकास विभागात 8,669 पदांची मेगाभरती; जाणून घ्या, सविस्तर

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 Notification : महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागात तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली असून, यामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळणार आहे. एकूण पदांचा आढावा घेतल्यानंतर काही जुनी पदे रद्द करून 165 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व बदलांनंतर विभागात आता एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून, लवकरच या भरतीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे.

भरती प्रक्रियेचा तपशील आणि आऊटसोर्सिंग
या मेगाभरतीमध्ये केवळ नियमित पदांचाच समावेश नाही, तर कामकाजाच्या सोयीसाठी बाह्ययंत्रणेचाही मोठा आधार घेतला जाणार आहे.
नियमित पदे: एकूण 8,669 पदे सरळसेवेने भरली जातील.
बाह्ययंत्रणा (Outsourcing): प्रशासकीय कामाच्या मदतीसाठी 2,843 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता मिळाली आहे.
नवे बदल: विभागाच्या गरजेनुसार 165 नवीन पदांची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा – CRPF Constable Recruitment: खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण! CRPF मध्ये नऊ हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांना मंजुरी
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मानधनाधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे:
अंगणवाडी सेविका: एकूण 1,10,664 पदे.
अंगणवाडी मदतनीस: एकूण 1,10,664 पदे.
अशा प्रकारे एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. सध्या या पदांवर मोठ्या संख्येने सेविका कार्यरत असून, रिक्त जागा भरण्यावरही भर दिला जाणार आहे.

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही भरती महिला व बालकांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय आता मार्गी लागल्याने प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल. या भरतीमुळे सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळण्यासोबतच ग्रामीण स्तरावरील आरोग्य आणि पोषण सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – CBSE Class 10 Result: निकालाची धाकधूक संपणार! CBSE 10 वीचा निकाल आज जाहीर होणार?; 'या' डायरेक्ट लिंकवर पाहा तुमचे गुण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number