Maharashtra Farmer : संत्रा बागायतदारांना मोठा दिलासा! अवकाळीच्या नुकसानीपोटी 12 कोटी 38 लाखांचे विशेष पॅकेज जाहीर

या मदतीमुळे नुकसानीच्या छायेत असलेल्या शेकडो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या बागांना पुन्हा सावरण्यासाठी बळ मिळणार आहे.

Maharashtra Farmer : संत्रा बागायतदारांना मोठा दिलासा! अवकाळीच्या नुकसानीपोटी 12 कोटी 38 लाखांचे विशेष पॅकेज जाहीर

Maharashtra Farmer : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला असून वर्धा जिल्ह्यातील बागायतदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भीषण अवकाळी पावसामुळे संत्रा बागांचे अतोनात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आर्वी, कारंजा आणि आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 12 कोटी 38 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावावर मोहोर उमटवत हे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

8,999 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार रक्कम
या विशेष पॅकेजचा लाभ जिल्ह्यातील 315 गावांमधील एकूण 8,999 शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रशासकीय पाहणीनुसार, अवकाळी पावसामुळे सुमारे 5,506 हेक्टरवरील संत्रा पिकाचे नुकसान झाले होते. ही मदतीची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय 'डीबीटी' (DBT) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे नुकसानीच्या छायेत असलेल्या शेकडो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या बागांना पुन्हा सावरण्यासाठी बळ मिळणार आहे.

हेही वाचा – Farmer Good News: शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट! पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; आता दोन लाखांपर्यंतचे व्यवहार मोफत

पारदर्शकतेसाठी जिल्हा प्रशासनाला कडक सूचना
मदत वाटप प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाला विशेष सूचना दिल्या आहेत. निधीचे वाटप करताना कोणत्याही लाभार्थ्याला दुबार मदत मिळणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. ज्या कारणासाठी हा निधी मंजूर झाला आहे, त्याच कामासाठी त्याचा विनियोग करणे अनिवार्य आहे. तसेच, मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि त्यांना मिळालेल्या रकमेचा सविस्तर तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उद्ध्वस्त बागा आणि फडणवीस सरकारचे आश्वासन
मागील वर्षीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे कंबरडे मोडले होते, उभ्या बागा डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्या वेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना सरकारने सरसकट मदतीचा शब्द दिला होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असताना, वर्धा जिल्ह्यातील फळबागांना प्राधान्याने मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवली आहे. या निर्णयामुळे विदर्भातील कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रलंबित मदतीची प्रतीक्षा आता संपली आहे.

हेही वाचा – Rashtriya Kisan Diwas 2025 : बळीराजाचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या सरकारच्या 5 महत्त्वाच्या योजना; जाणून घ्या सविस्तर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number