Maharashtra Flood Relief Fund: राज्यातील पुरग्रस्तांसाठी सरसावरले श्री सिद्धिविनायक ट्रस्ट; 10 कोटी रुपयांची मदत जाहीर

सध्या राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दैयनीय झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सध्या मोठ्या मदतीची गरज आहे. अशातचं आता श्री सिद्धिविनायक ट्रस्ट या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे.

Maharashtra Flood Relief Fund: राज्यातील पुरग्रस्तांसाठी सरसावरले श्री सिद्धिविनायक ट्रस्ट; 10 कोटी रुपयांची मदत जाहीर

Maharashtra Flood Relief Fund: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. अनेकांचे घरे, जनावरे, पिके आणि संपूर्ण संसारउपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दैयनीय झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सध्या मोठ्या मदतीची गरज आहे. अशातचं आता श्री सिद्धिविनायक ट्रस्ट या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने महाराष्ट्र मुख्यमंत्री पूर मदत निधीला 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ,

हेही वाचा – Maharashtra Flood Relief Fund : शेतकऱ्यांना दिलासा! 'या' तारखेपासून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 10 हजार रुपये

राज्यात ऑगस्टपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नाशिक, मराठवाडासह राज्यातील 36 पैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये पूर, मालमत्तेचे नुकसान आणि पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. ट्रस्टचे मानद अध्यक्ष सदानंद सरवणकर, मानद कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी आणि इतर विश्वस्तांनी 29 सप्टेंबर रोजी देणगी जाहीर केली. त्रिपाठी म्हणाले, 'नैसर्गिक आपत्तीमुळे पिके उद्ध्वस्त झाली, घरांचे नुकसान झाले आणि अनेक कुटुंबांना आर्थिक संकटात ढकलले. आमच्या सामाजिक जबाबदाऱ्या समजून आम्ही निधीत देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.' 

हेही वाचा – Weather Update Today: कोकणात पावसाचा जोर वाढला, मुंबईतही मुसळधार सरी कोसळणार; 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

यापूर्वीही ट्रस्टकडून मोठी मदत – 

ट्रस्टचे सामाजिक योगदान भूतकाळातही उल्लेखनीय राहिले आहे. जुलै 2005 मध्ये मुंबई आणि उपनगरातील मुसळधार पावसामुळे बाधित लोकांना, 2013 च्या दुष्काळातील बळींना, 2014 मध्ये माळीण भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना, तसेच 2019 मध्ये रत्नागिरीतील धरण फुटलेल्या गावकऱ्यांना ट्रस्टने आर्थिक मदत केली आहे. नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त, ट्रस्टने पुलवामा 2019 आणि मुंबई 26/11 हल्ल्यांतील मृतांच्या कुटुंबांना देखील मदत करून आपली सामाजिक जबाबदारी निभावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number