Monsoon Tourism : लोणावळा ट्रिपचा बेत आखताय? ‘या’ 10 पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण बंदी, नियम मोडल्यास थेट कोठडी

अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा तात्पुरता बंदीचा आदेश लागू केला आहे.

Monsoon Tourism : लोणावळा ट्रिपचा बेत आखताय? ‘या’ 10 पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण बंदी, नियम मोडल्यास थेट कोठडी

Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनासाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय केंद्र असलेल्या लोणावळ्यात जाण्याचा तुमचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, आगामी 31 ऑगस्टपर्यंत लोणावळा परिसरातील तब्बल 10 अतिशय प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेली 'ती' 10 प्रसिद्ध ठिकाणे
वीकेंडला हजारो पर्यटकांची गर्दी खेचून घेणारी खालील प्रमुख ठिकाणे आता 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद राहतील:
– भाजे धबधबा आणि कार्ला लेणी
– लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि तुंग किल्ला
– टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आणि शिवलिंग पॉईंट
– पवना धरण परिसर
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या धोकादायक स्पॉट्सवर लपून-छपून जाण्याचा प्रयत्न केल्यास पर्यटकांवर थेट कठोर कायदेशीर व पोलीस कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – उष्णतेचा वाढता धोका! जगातील टॉप 50 Heat Risk शहरांमध्ये महाराष्ट्रातील 'ही' दोन शहरे; अहवालाने वाढवली चिंता

बंदी घालण्यामागचे मुख्य कारण काय?
पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्यातील किल्ल्यांच्या वाटा प्रचंड घसरड्या होतात, तसेच धबधब्यांचा पाण्याचा वेग आणि धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी यामुळे दरवर्षी अनेक जीवघेणे अपघात घडतात. अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आणि पर्यटकांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांनी हा तात्पुरता बंदीचा आदेश लागू केला आहे.

प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन
हा आदेश केवळ पर्यटकांच्या हितासाठी काढण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणताही नाहक मानसिक त्रास किंवा पोलिसांचा ससेमिरा टाळायचा असल्यास नागरिकांनी स्वतःहून या 10 ठिकाणी जाणे टाळावे. पावसाळ्यात फिरताना सुरक्षित स्थळांची निवड करावी आणि 31 ऑगस्टपर्यंत लोणावळ्यातील या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये न जाता सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – BMC: फोटो काढा, लोकेशन पाठवा आणि तक्रार नोंदवा! BMC ने तक्रारींसाठी सुरू केला खास WhatsApp चॅटबॉट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number