Loan Waiver in Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. यापुढे कर्जमाफी योजनेत रकमेची कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती मिळत आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये 1.5 (दीड) लाख ते 2 लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, या नवीन निर्णयामुळे राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
35 हजार कोटींची थकबाकी होणार माफ
सध्याच्या स्थितीत राज्यातील 24 लाख 73 हजार शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे बँकांची जवळपास 35 हजार 477 कोटी रुपयांची मोठी थकबाकी आहे. राज्यातील 35 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकबाकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा न ठेवता थेट त्यांचा सातबारा उतारा (7/12) कोरा केला जाणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभ्यास समिती आणि अंमलबजावणीची तारीख
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.
हेही वाचा – Mumbai Weather Update: आज महाराष्ट्राच्या हवामानात होणार मोठा बदल; IMD ने दिला महत्त्वाचा इशारा
30 जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन
कृषीमंत्र्यांनी पुढे सांगितले की, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. सरकारच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
पूर्वीच्या योजनांमुळे झाले होते नुकसान
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने यापूर्वी 2017 मध्ये 1.5 लाखांची (दीड लाखांची) आणि 2019 मध्ये 2 लाखांची कर्जमाफी दिली होती. मात्र, रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक गरजू शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नव्हते. परंतु, आताच्या नवीन आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा (7/12 Clear) होणार असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – Teacher Strike: TET अनिवार्यता रद्द करा! शिक्षकांच्या आंदोलनामुळे 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंदची हाक