Vijay Kumbhar Video : विजय कुंभार यांचं लेटर बॉम्ब; पार्थ पवारांच्या सहीची दोन पत्रे माध्यमांसमोर उघड

कुंभार यांनी पोलिसांवर ताशेरा झाडत पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास करण्यास टाळाटाळ केली जात आहे आणि गुन्हेगारांना सवलत दिली जात आहे, असे ते म्हणाले.

Vijay Kumbhar Video : विजय कुंभार यांचं लेटर बॉम्ब; पार्थ पवारांच्या सहीची दोन पत्रे माध्यमांसमोर उघड

Vijay Kumbhar on Parth Pawar : पुण्यातील मुंढवा येथील शासकीय भूखंडाच्या गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी पार्थ पवार यांचा या प्रकरणात कसा संबंध आहे, ही बाब समोर आणण्यासाठी दोन पत्रे माध्यमांसमोर सादर केली. ही दोन्ही पत्रे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या सहीनिशी असल्याचे कुंभार यांनी सांगितले. यापैकी एक पत्र जूनमधलं असून दुसरं 6 नोव्हेंबरचं आहे, असे ते म्हणाले. ही पत्रेच पार्थ पवार यांचा या जमीन गैरव्यवहाराशी जवळचा संबंध असल्याचे दर्शवतात, असे कुंभार यांनी म्हटले आहे. कुंभार अनेक दिवसांपासून या प्रकरणावर वारंवार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दरम्यान, कुंभार यांनी पोलिसांवरही ताशेरा झाडत पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचे म्हटले आहे. चौकशीदरम्यान संशयित आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार पोलीस करत वारंवार आहेत, ही बाब गंभीर असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे. सामान्य आरोपीला पोलिसांनी कशा प्रकारे हाताळले असते आणि तशा प्रकरणी आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार केली असती का, असा सवाल कुंभार यांनी केला. तसेच, या प्रकरणातील संशयित आरोपी हाय-प्रोफाईल असल्यामुळे अशी काहीही तकलादू कारणे आणि सबबी सांगितल्या जात असल्याचे सहजच लक्षात येते, असेही ते म्हणाले. या प्रकरणात पोलिसांकडून तपास करण्यास टाळाटाळ केली जात आहे आणि सर्व गुन्हेगारांना सवलत दिली जात आहे, असे ते म्हणाले. यामुळे मूळ आरोपीपर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे. तसेच, या प्रकरणात पार्थ पवारांचा संबंधच नाही, ही बाब शक्य नसल्याचेच पुराव्यांवरून दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाची 40 एकर जमीन खरेदी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. कंपनीच्या वतीने भागीदार दिग्विजय पाटील व कुलमुखत्यारपत्र धारक शीतल तेजवानी यांच्यात दस्त नोंदणीचा व्यवहार झाला होता. 

हेही वाचा – Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या; सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा कायम

‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमिनीच्या विक्री प्रकरणातील सूत्रधार आरोपी शीतल तेजवानी असल्याचे सांगत तिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली आहे. मात्र, “या प्रकरणात संशयाला वाव आहे”, असं वक्तव्य माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय कार्यकर्ते) विजय कुंभार यांनी या अटकेनंतर केले होते. 

त्यावेळेस विजय कुंभार म्हणाले होते, ‘पुढच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन होत असून या अधिवेशनात मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारावरून गोंधळ होऊ नये म्हणून ही अटक केल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तेजवानी यांना अटक झाल्याबद्दल खूश व्हायचं काही कारण नाही. मुळात या अटकेला टाळाटाळ का केली जात होती असा प्रश्न उपस्थित करायला हवा. तसेच आता दिग्विजय पाटील व पार्थ पवारांनाही अटक करायला हवी.’

कुंभार यांनीच मुंढव्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढले होते. तसेच, पार्थ पवार यांना काही दिवसापूर्वी कथितपणे क्लीन चिट मिळण्याबाबत कुंभार यांनी मोठे वक्तव्य केले होते. पार्थ पवार यांनी क्लीन चिट मिळणे हा महाराष्ट्राचे सरकार रसातळाला गेल्याचा पुरावा आहे, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा – Rohit Pawar on Maharashtra Election Commission : ‘लोकशाहीची अशी गळचेपी…’, तारखा जाहिर होताच रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर निशाणा 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number