Mahabaleshwar Rain Updates: दरडी कोसळल्या, रस्ते खचले अन् अनेक गावांचा संपर्क तुटला; महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

Mahabaleshwar Rain Updates: दरडी कोसळल्या, रस्ते खचले अन् अनेक गावांचा संपर्क तुटला; महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

Mahabaleshwar Rain Updates: मराठवाडा वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले असून मुंबई आणि उपनगरांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्या 100 वर्षांतील ऐतिहासिक आणि सर्वाधिक मानला जात आहे.

डोंगरी भागात जनजीवन विस्कळीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
या अभूतपूर्व पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम बाजूकडील दुर्गम आणि डोंगरी भागातील नागरिकांचे हाल झाले आहेत. महाबळेश्वरमधील मुख्य रस्त्यांवर पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडे उन्मळून पडल्यामुळे आणि वीजवाहिन्या तुटल्यामुळे अनेक परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. घाटरस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड आल्याने अनेक गावांचा मुख्य शहरांशी असलेला संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

पर्यटन स्थळांना आले वैभव, पण स्थानिकांवर संकट
या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक, तलाव आणि धबधबे ओसंडून वाहत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने हे चित्र सुखावणारे असले तरी स्थानिक नागरिकांसाठी मात्र हा पाऊस मोठे संकट ठरला आहे. जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- Tourists Fined at Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याकडे रेल्वे रुळांवरून चालत जाणे पडले महागात; रेल्वे पोलिसांनी वसूल केला इतक्या हजारांचा दंड

खंडाळा तालुक्यातील अतिट गावात ढगफुटी
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अतिट गावामध्ये रात्रभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. डोंगरावरून आलेल्या प्रचंड प्रवाहामुळे स्थानिक ओढे-नाल्यांना भीषण पूर आला आहे. पुराचे पाणी गावातील मंदिर परिसरात आणि रस्त्यांवर घुसले आहे. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून बाधित ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number