Ladki Bahin Yojana : e-KYC पूर्ण असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे रखडले; मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार? वाचा महत्त्वाची अपडेट

मार्च आणि एप्रिल 2026 या दोन महिन्यांचे हप्ते अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याने राज्यातील 'लाडक्या बहिणीं'मध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Ladki Bahin Yojana : e-KYC पूर्ण असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे रखडले; मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार? वाचा महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सध्या निधी वितरणाअभावी चर्चेत आली आहे. मार्च आणि एप्रिल 2026 या दोन महिन्यांचे हप्ते अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याने राज्यातील 'लाडक्या बहिणीं'मध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, ई-केवायसीची (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही तांत्रिक कारणांमुळे हा लाभ रखडला आहे.

हप्ते रखडण्याचे नेमके कारण काय?
महिला व बालविकास विभागाने बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती. 30 एप्रिल 2026 ही यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. सध्या या सर्व अर्जांची आणि केवायसीची पडताळणी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. पडताळणीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील निधी वितरित न करण्याचा पवित्रा सरकारने घेतल्याचे समजते.

खात्यात 4500 रुपये येणार की 3000?
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात प्रलंबित हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. लाभार्थी महिलांमध्ये आता दोन शक्यतांची चर्चा आहे:

मार्च + एप्रिल: केवळ दोन महिन्यांचा निधी मिळाल्यास महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील.

मार्च + एप्रिल + मे: जर सरकारने मे महिन्याचा हप्ताही सोबतच दिला, तर एकत्रित 4500 रुपये महिलांना मिळू शकतात.

बोगस लाभार्थ्यांना चाप
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या किंवा सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा – Pratap Sarnaik : बाईक, टॅक्सी ॲप्सविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रताप सरनाईकांचे सायबर विभागाला पत्र

मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष
पुढील 2 दिवसांत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधी वितरणाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. निधी मंजूर होताच थेट बँक खात्यात (DBT) पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number