Municipal Corporation Job : महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 700 नवीन पदे भरणार; जाणून घ्या, काय असेल पात्रता

महापालिकेतील प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी आवश्यक असणारी सुमारे 700 नवीन पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Municipal Corporation Job : महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 700 नवीन पदे भरणार; जाणून घ्या, काय असेल पात्रता

Municipal Corporation Job : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रलंबित सेवा प्रवेश नियमावलीला अखेर मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासूनच अशी नियमावली अस्तित्वात नव्हती. 335 नवीन पदांची निर्मिती करून तयार करण्यात आलेल्या 4,445 पदांच्या आकृतिबंधाला दोन वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली होती, परंतु सेवानियमावली रखडल्यामुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी आवश्यक असणारी सुमारे 700 नवीन पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

10 विभागांत पारदर्शक भरती; 'नगरसचिव' आता 'महापालिका सचिव'
नव्याने लागू करण्यात आलेल्या या सेवा नियमावलीत महापालिकेच्या कामकाजाचे 10 वेगळे विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये नोकरभरतीसाठी स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अर्हता, बदल्या, आरक्षण, वयोमर्यादा, पदोन्नती आणि संगणक ज्ञान यांसारख्या विविध बाबींचे स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. तसेच या नियमावलीनुसार 'नगरसचिव' या पदाचे नाव बदलून आता अधिकृतपणे 'महापालिका सचिव' असे करण्यात आले आहे.

182 पदांसाठी पहिला प्रस्ताव; गरजेनुसार होणार भरती
आकृतिबंधातील सर्व 4,445 पदे एकदम न भरता, महापालिकेच्या गरजेनुसार आणि राज्य शासनाच्या परवानगीनेच ही पदे भरली जाणार आहेत. यापैकी प्राथमिक टप्प्यात 182 रिक्त पदांच्या भरतीसाठी महापालिकेने सरकारकडे आधीच प्रस्ताव पाठवला आहे. याव्यतिरिक्त इतर अत्यावश्यक विभागांतील पदे विचारात घेता, नजीकच्या भविष्यात तब्बल 700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – Maharashtra Government: Gen Z साठी मोठी खुशखबर! राज्यभर 1,000 रोजगार मेळावे; सरकारचे 9 मोठे निर्णय

एका महापालिकेतून दुसऱ्या महापालिकेत कायमस्वरूपी बदलीचा नवा नियम
या नवीन नियमावलीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना एका महापालिकेतून दुसऱ्या महापालिकेत समान संवर्गाच्या पदावर अर्जाद्वारे कायमस्वरूपी बदली करून घेणे शक्य होणार आहे. यासाठी दोन्ही संबंधित महापालिकांच्या प्राधिकरणांची संमती असणे अनिवार्य असेल. मात्र, ही बदली नियुक्ती पदोन्नतीच्या (Promotion) पदांवर लागू असणार नाही. अ आणि ब वर्गातील उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या परस्पर सहमतीनेच घेतला जाईल.

अधिकारी नेमणूक अशी असेल
– आयुक्त – शासनाकडून नियुक्त
– अतिरिक्त आयुक्त – एक शासन, एक महापालिकेतील पदोन्नतीने
– उपायुक्त – पाचपैकी तीन महापालिका, दोन शासन नियुक्त
– सहायक आयुक्त – दहापैकी सात महापालिका, तीन शासन नियुक्त
– कामगार अधिकारी, रवका अधिकारी, साहायक विधी अधिकारी – पदोन्नतीने
– महापालिका सचिव, उपसचिव – पदोन्नतीने
– करनिर्धारक व संग्राहक, साहाय्यक करनिर्धारक, उद्यान अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, ग्रंथपाल, विवाह नोंदणी प्रबंधक, नाट्यगृह व्यवस्थापक – पदोन्नतीने
– अधीक्षक पदे – 75 टक्के मनपा पदोन्नतीने

हेही वाचा – Post Recruitment 2026: सरकारी नोकरीची उत्तम संधी; भारतीय टपाल विभागात 'या' पदासाठी भरती सुरू; 63,200 रुपयांपर्यंत मिळेल पगार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number