Ration Card New Rules : रेशन कार्डासंबंधी नवा नियम! सलग 6 महिने धान्य न घेतल्यास कार्ड होणार निष्क्रिय

केंद्र सरकारचा नवा 'सुधारणा आदेश 2025' लागू झाला आहे. याअंतर्गत सलग 6 महिने रेशन न घेतल्यास कार्ड रद्द होणार आहे.

Ration Card New Rules : रेशन कार्डासंबंधी नवा नियम! सलग 6 महिने धान्य न घेतल्यास कार्ड होणार निष्क्रिय

Ration Card New Rules : केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला असून, सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. आता जर तुम्ही रेशन कार्डचा वापर करून धान्य उचलले नाही, तर तुमचे कार्ड कायमचे बंद होऊ शकते.

सहा महिन्यांचा नवा नियम
जुलै 2025 मध्ये केंद्र सरकारने “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश” अधिसूचित केला आहे. या नवीन नियमानुसार, ज्या कुटुंबांनी रेशन दुकानातून सलग 6 महिने धान्य घेतले नाही, त्यांचे रेशन कार्ड 'इनअ‍ॅक्टिव्ह' म्हणजेच निष्क्रिय केले जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळणारे लाभार्थीही या कक्षेत येणार आहेत. केवळ रेशन मोफत आहे म्हणून ते उचलले नाही, तरीही तुमचे कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार असेल.

बनावट कार्डांवर कारवाईचा बडगा
सध्या संपूर्ण देशात सुमारे 23 कोटी सक्रिय रेशन कार्ड आहेत. सरकारच्या या नव्या छाननी प्रक्रियेमुळे जवळपास 7 ते 18 टक्के रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बनावट, दुहेरी आणि अपात्र कार्डांची संख्या कमी करून खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचवणे, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. सर्व राज्यांना या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

हेही वाचा – Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; 31 डिसेंबरपर्यंत 'हे' काम न केल्यास होईल मोठे नुकसान

दर 5 वर्षांनी होणार ई-केवायसी
आता केवळ रेशन कार्ड असणे पुरेसे नाही, तर दर 5 वर्षांनी तुमची पात्रता तपासली जाणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेशन कार्डमधील 5 वर्षांखालील मुलांचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. तसेच मुलांचे वय 5 वर्षे पूर्ण होताच त्यांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक असेल. जर एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद आढळली, तर ते कार्ड 3 महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि तपासणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

प्रतीक्षा यादी आणि नवीन कार्ड प्रक्रिया
नवीन रेशन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेतही सरकारने बदल केले आहेत. यापुढे नवीन कार्ड मंजूर करताना 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वाचा वापर केला जाईल. प्रत्येक राज्याला आपल्या पोर्टलवर नवीन कार्डसाठीची प्रतीक्षा यादी (Waiting List) जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रेशन वाटप व्यवस्थेत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – CNG-PNG Gas Price Cut: 1 जानेवारीपासून CNG, घरगुती PNG गॅस स्वस्त होणार; ग्राहकांना आता प्रति युनिट 'इतके' पैसे मोजावे लागणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number