Eye cancer symptoms : डोळ्यांना होणाऱ्या अशा त्रासाकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो जीवघेणा आय कॅन्सर, तज्ज्ञांचा मोठा इशारा

हा आजार प्रामुख्याने वयोगटानुसार वेगवेगळ्या स्वरूपात रुग्णांमध्ये पाहायला मिळतो, ज्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ..

Eye cancer symptoms : डोळ्यांना होणाऱ्या अशा त्रासाकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो जीवघेणा आय कॅन्सर, तज्ज्ञांचा मोठा इशारा

Eye cancer symptoms : अनेकदा डोळ्यात सतत ठणका लागणे, अंधुक किंवा धूसर दिसणे तसेच अचानक दृष्टी कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवल्यास आपण त्याकडे चष्म्याचा नंबर बदलला असेल किंवा थकवा आला असेल या मानसिकतेने पाहतो. परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही वरवर साधी वाटणारी लक्षणे डोळ्यांच्या कर्करोगाची (Eye Cancer) सुरुवातीची चिन्हे असू शकतात. जरी हा आजार इतर कर्करोगांच्या तुलनेत दुर्मिळ असला, तरी योग्य वेळी त्याचे निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाची दृष्टी जाण्याचा किंवा थेट जिवाला मुकण्याचा धोका निर्माण होतो.

पेशींची अनियंत्रित वाढ हे मुख्य कारण
नेत्रविकारांवर संशोधन करणाऱ्या Centre for Sight या नामांकित संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा डोळ्यांतील पेशींची वाढ अनियंत्रित आणि वेगाने होऊ लागते, तेव्हा आय कॅन्सरचा धोका निर्माण होतो. हा कर्करोग डोळ्याच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागांमध्ये जसे की रेटिना, आयरिस किंवा यूव्हियामध्ये पसरू शकतो. जर अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातच या आजाराचे अचूक निदान झाले, तर अत्याधुनिक उपचारांमुळे कर्करोगावर मात करून रुग्णाची दृष्टी वाचवणे पूर्णपणे शक्य होते.

वयोगटानुसार आढळणारे डोळ्यांच्या कर्करोगाचे प्रकार
हा आजार प्रामुख्याने वयोगटानुसार वेगवेगळ्या स्वरूपात रुग्णांमध्ये पाहायला मिळतो, ज्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
Intraocular Melanoma: हा प्रौढ आणि ज्येष्ठ व्यक्तींमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोगाचा प्रकार आहे. यामध्ये रुग्णाची पुतळी लहान-मोठी होणे, डोळ्याच्या पुतळीवर काळे डाग पडणे किंवा अचानक दृष्टीक्षेत्र कमी होणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
Retinoblastoma: हा प्रकार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. जर मुलांच्या डोळ्यांच्या बाहुलीमध्ये पांढरे प्रतिबिंब किंवा चमक दिसत असेल, डोळे तिरळे झाले असतील किंवा त्यांना पाहण्यास अडचण येत असेल, तर पालकांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा – 'माणसाचे मांस खाणारी डाळ' रोजच्या जेवणात? जाणून घ्या IAS च्या मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नामागचे वैज्ञानिक सत्य!

कधीही दुर्लक्ष न करता येणारी प्रमुख लक्षणे
सुरुवातीच्या काळात या कर्करोगात डोळ्यांमध्ये अजिबात वेदना होत नाहीत, ज्यामुळे रुग्ण तपासणीस उशीर करतात. मात्र, शरीराने दिलेले खालील संकेत वेळीच ओळखणे गरजेचे आहे. यामध्ये सतत किंवा अचानक अंधुक दिसू लागणे. समोर असलेल्या सरळ रेषा अचानक वाकड्या किंवा वेड्यावाकड्या दिसणे. डोळ्यांच्या बाहुलीचा मूळ रंग अथवा आकार बदलणे. डोळ्याच्या आजूबाजूला अचानक सूज येणे किंवा बारीक गाठ जाणवणे. डोळे सतत लाल राहणे आणि एकाच डोळ्याची दृष्टी अचानक अंधूक होणे.

धोका वाढवणारे घटक आणि बचावाचा उपाय
कौटुंबिक इतिहास म्हणजेच घरात आधी कोणाला कर्करोग असणे, हलक्या किंवा निळ्या रंगाचे डोळे असणे, वाढते वय, धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन यामुळे या आजाराचा धोका वाढतो. याशिवाय, जे लोक रसायनांच्या संपर्कात काम करतात किंवा ज्यांचा सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांशी थेट संबंध येतो, त्यांनाही हा आजार होऊ शकतो. या सर्व धोक्यांपासून वाचण्यासाठी नियमितपणे नेत्रतपासणी करणे हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. आजार बळावण्यापूर्वीच लेसर, रेडिएशन किंवा लहान शस्त्रक्रियेच्या मदतीने यावर यशस्वी उपचार करता येतात.

हेही वाचा – Benefits of Meditation: मन करा रे प्रसन्न! ध्यानामुळे चिंता आणि ताण होईल कायमचा दूर; जाणून घ्या मेडिटेशनची योग्य वेळ आणि शास्त्रोक्त पद्धत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number